Home जळगाव रावेर आठवडे बाजारात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट आॅफिस सेविंग बँक...

रावेर आठवडे बाजारात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट आॅफिस सेविंग बँक मेळावा उत्साहात संपन्न

78
0

शरीफ शेख

रावेर , दि. १९ :- रावेर पोस्ट आॅफिस कडुन रावेर आठवडे बाजारात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट आॅफिस सेविंग बँक मेला श्री. पी. बी. शेलुकर अधिक्षक व श्री. म्हसके उपअधीक्षक भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला, सदर ठिकाणी डाक घराअंतगत योजना ची माहिती दिली, या मेळाव्यात श्री . विनोद कासार, श्री. संतोष इंगळे, पोस्ट मास्तर प्रसाद वाणी रावेर आणि रावेर डाकघरातील सर्व कर्मचारी व सर्व शाखा डाकघरातील कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी या मेळाव्यात उस्फूर्त सहभागी होवुन अमूल्य सहकार्य केले.सदर मेळाव्यात बाजारात आलेल्या सर्व जनसामान्यांना डाक घराअंतर्गत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि पेमेन्ट बँकेचे खाती त्वरित उघडून देण्यात आली.
डाक सहायक श्री. किरण महाजन, श्री. दिनेश, श्री जयदीप व श्री. हिमांशू तसेच विषेश सहकार्य श्री. जमशेर, सागर, मनोहर, रुले मास्तर, वैशाली, निवेदिता , किर्ती व काजल व शांताराम महाजन यांचे होते.