Home परभणी कविता गाऊन बाबासाहेबांना अभिवादन

कविता गाऊन बाबासाहेबांना अभिवादन

43
0

प्रतिनिधी

कोरोना महामारीचे नियम पालन करीत महाकवी वामनदादा कर्डक लिखित ‘पहाट झाली’ कविता गाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बुधवारी अभिवादन करण्यात आले.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाणे समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणी असलेल्या भव्य अशा पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते, लेखक राहुल साबणे यांनी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेली व गायलेली ‘पहाट झाली ‘ ही कविता स्वतःच्या आवाजात सादर केली. यावेळी धनगर सम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, एड उत्तमराव काळे, विजय सरवदे आदींची उपस्थिती होती.