जळगाव

रावेर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची तालुका स्तरीय महत्त्वपुर्ण बैठक

Advertisements

शरीफ शेख

रावेर , दि. १८ :- वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची दि.१९\१\२०२० रविवार रोजी रावेर तालुका स्तरीय महत्त्वपूर्ण बैठक रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे.
श्रधेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या आदेशान्वय संपुर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे दि. २४\१\२०२० रोजी शुक्रवारी आपण सुद्धा रावेर शहर बंद ठेवणार आहे. CAA , NRC या संदर्भात महाराष्ट्र बंद आहे. तरी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची मत्त्वपुर्ण बैठक उद्या दि.१९\१\२०२० रोजी रविवार सकाळी ११:३० वाजता रावेर येथिल सावदा रोड वरील नविन रेस्ट हाउस ( विश्राम गृह ) रावेर येथे आयोजित केली आहे.

तरी या बेठकीला न चुकता आपण व आपल्या गावातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन येणे तसेच फुले , शाहु, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माणनाऱ्या बहुजन OBC, ST, SC, VJNT तसेच बौद्ध समाजातील इतर पक्षा मध्ये , संस्थे मध्ये काम करणाऱ्या बौद्ध समाजात समाज कार्य करणाऱ्या सर्व पदधिकारी व कार्यकर्त्यांनी या बेठकीला जास्तीत जास्त संखेने उपस्तित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे रावेर ता अध्यक्ष बाळु शिरतुरे , सलिम शाह, रफिक बेग , सुरेश अटकाळे , नितिन अवसरमल , बाळा शिरतुरे , अर्जुन वाघ , राहुल गाढे , उमेश सवर्णे , प्रकाश तायडे , नरेंद्र करवले , आकाश तायडे ,गौतम अटकाळे , सोनु कोंघे , विनोद तायडे , तेजस गाढे , संदीप कोचुरे , सतीश काकड़े , राहुल भालेराव , संदीप शिरतुरे , सोनु तायडे , रविन्द्र वाघ , संघरत्न शिरतुरे इत्यादींनी केले आहे.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...