Home महत्वाची बातमी शिर्डी आणि पाथरी प्रश्नांबाबत उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची...

शिर्डी आणि पाथरी प्रश्नांबाबत उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची घेतली भेट.

165

● शिर्डी बंद मागे घेण्याची आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

● पुढील आठवड्यात शिर्डी आणि पाथरी ग्रामस्थांची बैठक घेणार – मुख्यमंत्री ठाकरे

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

पुणे , दि.१८ :- शिर्डी साईबाबा जन्मस्थानांचा मुद्दे खूप वर्षापासून प्रलंबित आहे. साईबाबांनी त्यांचे आयुष्य हे लोक कल्याणासाठी वाहिले होते. जन्मस्थानाच्या मुद्दयावरुन भविकांत गैरसमज पसरत आहेत. जन्मस्थान हा भाविकांच्या आस्थेचा विषय असला तरी त्यात बऱ्याच गोष्टी पुरात्तत्व विभागाशी सलंग्न आहेत. यात शिर्डी आणि पाथरी येथील भाविकांचे आणि ग्रामस्थांशी बैठक घेऊन दोन्ही ठिकाणचा विकास होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. तसेच माजी न्यायमूर्ती आणि पुरातत्व विभागाचे तज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीस तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येऊन साईबाबाच्या जन्मस्थानाच्या निवाडा करण्यात यावा अशी सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली.

हा बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात यावे आणि तात्काळ शिर्डी येथील ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात यावी अशी सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढील आठवड्यात शिर्डी आणि पाथरी येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. व शिर्डी ग्रामस्थांनी बंद मागे घेण्याची आवाहन केले.