Home विदर्भ कुंभकर्णी झोपेतील नगरपालिकेला जागवण्यासाठी नगरसेवक साकिब शहा यांचे भीक मांगो आंदोलन

कुंभकर्णी झोपेतील नगरपालिकेला जागवण्यासाठी नगरसेवक साकिब शहा यांचे भीक मांगो आंदोलन

249

बलवंत मनवर

यवतमाळ –  पुसद विकासाचे तर सोडाच साधे रस्ते, नाले आणि पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा नगरपालिका जन सुविधा पुरविताना कमी पडत आहे. ते भ्रष्टाचाराच्या कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरीकांना रस्त्यातील खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नगरपालिकेला जागे करण्यासाठी भीक मांगो आंदोलनातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक साकिब शहा यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.
जनतेच्या कराच्यापैशातून जनसुविधा उभारण्याचे नियोजनाचे कर्तव्य नगरपालिके कडे असताना आजही नगरपालिका कार्यक्षेत्रातील सुविधा बाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपालिकेचा लाजीरवाणा कारभार, भ्रष्टाचारात व्यस्तअसल्यामुळे पुसद नगरपालिका चर्चेचाच नव्हेतर निषेधाचा विषय बनली आहे त्यामध्ये पुसदकरांना सुविधा मिळत नसल्याने शहराची अवस्था खेडयापेक्षाही बत्तर असल्याची परिस्थिती आज मितीस पहायला मिळत आहे त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या वेदना, समस्या चा पाढा नेहमी वाचूनही नगरपालिकेवर कोणताही परिणाम होत नाही असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक साकिब शहा यांनी केला आहे.
ज्या नगरपालिकेचा उगम स्वर्गीय वसंतराव नाईक व स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारामुळे झाला त्याच पुसद शहरातील चौकाची मुख्य शान असणाऱ्या वसंतराव नाईक चौकापासून ते शनि मंदिरापर्यंत व वसंतराव नाईक चौकापासून ते मुखरे चौकापर्यंत च्या रस्त्याची अशी दुरावस्था असेल तर मग शहरातील रस्त्याबाबत न बोललेलेच बरे रस्त्याच्या समस्या बाबत अनेक नागरिकांनी, संघटनांनी दुरुस्तीसाठी मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला जागे करण्यासाठी व रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे व यामुळे ही समस्या वाढून कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी भिक मांगो आंदोलन करून रस्ता दुरुस्ती लोकवर्गणीतून करण्याचा मानस ठेवून हा आंदोलनाचा पवित्रा पुसदकर यांच्या सहकार्याने यशस्वी करावयाचा आहे. तेंव्हा ज्या नागरिकांना रस्ता दुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलनामध्ये मदत करावयाची आहे त्यांनी दिनांक 23/3/2021 रोजी स्थळ वसंतराव नाईक चौक दि 24/3/2021 रोजी स्थळ बिरसा मुंडा चौक, 25/3/2021 रोजी स्थळ मुखरे चौक तसेच 26/3/2021 रोजी स्थळ मुखरे चौक या सर्व ठिकाणी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आयोजित भीक मांगो आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी मदत करावी असे आवाहन नगरसेवक साकिब शहा यांनी पुसदकरांना केले आहे
पुसद नगरपालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवक असताना सभागृह मध्ये पारदर्शी कामासह इतर प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न सतत नगरसेवक साकिब शहा करीत असतात तसेच त्यांनी ‘बंद करो ये भ्रष्टाचार’ असे आंदोलन उभारून अपंग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधी मिळवून दिला, भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न सोबतच थकीत घरकुलाचे शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्यात उपोषणाच्या यशस्वी मार्ग सुद्धा अवलंबला होता. कोरोना काळातील भ्रष्टाचारा सोबतच त्यांनी अनेक जन सुविधेच्या प्रश्‍नासाठी लढा दिला आहे. नुकत्याच एका मॅनेज झालेल्या टेंडर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेताच त्यामध्ये टेंडर मॅनेज प्रकरण उघडकीस आणून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अयशस्वी केल्याने आता रस्त्याच्या समस्या वरून सुरू केलेल्या आंदोलनाला काय प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.