Home मराठवाडा अजूनही माणुष्की जीवंत आहे

अजूनही माणुष्की जीवंत आहे

612

…. आणि आपत्तीग्रस्त व्यापाऱ्याच्या मदतीला धावून आले आदर्श व्यापारी…!

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

म्हणतात ना ‘ यथा राजा तथा प्रजा ‘ हेच खरे आहे.याचा प्रत्यय कुंभार पिंपळगाव येथील बाजारपेठेत दिसून आला.बाजारपेठेतील शरद शिंदे या होतकरू व्यापाऱ्याचे गॅरेज विजेची तार तुटून पडल्याने जळाले… उदरनिर्वाहासाठी असलेले साधन आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने शरद शिंदे हा तरूण हतबल झाला होता.अशा कठिण परिस्थिती मध्ये व्यापारी महासंघ व्यापाऱ्याच्या मदतीला धावून आल्याने, उध्दवस्त झालेल्या व्यापाऱ्याचा संसाराचा गाडा पुढे चालणार आहे…स्वार्थी आणि मतलबी समाजजीवनात अजूनही माणुष्की जीवंत आहे याचाही प्रत्यय या निमित्ताने आला.आगीत गॅरेज दुकान जळाल्याने आर्थिक नुकसान झाले ,भांडवल संपले आणि घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यातच वीजवितरण कंपनीने वर हात केल्याने शरद शिंदे पुढे पेच निर्माण झाला होता.याची दखल व्यापारी महासंघाने घेतली.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेषराव कंटुले यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी एकत्र आले.बाजारपेठेत आपत्तीग्रस्त व्यापाऱ्याच्या मदतीचे आवाहन केले,त्यास व्यापाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.व्यापारी स्वखुशीने मदतीसाठी पुढे सरसावले १ लाख १५ हजारांची मदत झाली… शरद शिंदे या तरुण व्यापाऱ्याचे गॅरेज पुन्हा उभे राहणार आहे.व्यापारी महासंघाला शरद शिंदे यांनी धन्यवाद दिले आहेत.कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी महासंघ , आपत्तीच्या काळात व्यापाऱ्याच्या मदतीला धावून आल्याने व्यापारी महासंघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.