Home परभणी मस्जिद बांधकामांचे आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते उद्घाटन .

मस्जिद बांधकामांचे आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते उद्घाटन .

102

हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक रेनाखळी गाव !!..

पाथरी अहमद अन्सारी

पाथरी तालुक्यात प्रसिद्ध असलेले रेनाखळी येथे दिनांक 5 फेब्रुवारी पुरातन असलेली व जीर्ण झालेली मस्जिद पाडून नवीन बांधकामाचे उद्घाटन विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आले .
रेनाखळी येथे असलेल्या या मस्जिदचे वैशिष्ट्य म्हणजे ही मस्जिद अगदी हिंदू वस्तीत असून पूर्वीपासून लोक कुठल्याही वादाशिवाय गुण्यागोविंदाने राहात आहेत . रेनाखळी येथे मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेले मस्जिद हिंदू वस्तीत असून हिंदू बांधवांचे ग्रामदैवत हनुमान मंदिर हे मुस्लिम वस्तीमध्ये असल्याने सर्व धर्माचे लोक नेहमी एकमेकांमध्ये मिळून मिसळून वागत असल्याने रेनाखळी हे गाव हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाते . हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक म्हणून आज रेनाखळी येथे मस्जिद बांधकामाच्या उद्घाटनासाठी रेनाखळी येथील सर्वधर्मीय लोक उपस्थित होते, यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व इतरांनी मस्जिद बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या .


यावेळी ज्येष्ठ नागरिक व तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तीराम हरकळ, उत्तम तात्या हरकळ ,सुभाषराव इंगळे ,दादाराव हारकळ तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तुकाराम हरकळ ,बाबासाहेब हरकळ ,मुंजा हरकळ ,गोविंद चिंचाणे ,रामकिसन गिरी व नियोजित सरपंच राहुल ब्रह्मराक्षे विष्णु तालडे उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अलीम भाई ,अनिस भाई ,तसेच शेख सलीमभाई व बहुसंख्येने हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते
यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा सत्कार तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तीराम हारकळ यांच्या हस्ते करण्यात आला मस्जिद जीर्ण झाल्याने पाडण्यात येऊन नवीन बांधकाम करण्यात येत असल्याचे मनोगत यावेळी उपस्थित असलेले मौलाना जहीर अब्बास यांनी व्यक्त केले. यावेळी पाथरी चे माजी नगरसेवक मुस्तफा टेलर व फिरोज खान उपस्थित होते . सर्व हिंदू बांधवांचे मुस्लिम बांधवांनी हार व शाल देऊन सत्कार केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सलीम यांनी केले. यावेळी गावातील बहुसंख्य हिंदू मुस्लिम समाजातील सर्व लोक उपस्थित होते .