Home विदर्भ शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने; केंद्र सरकारचा केला निषेध

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने; केंद्र सरकारचा केला निषेध

153
0

ईकबाल शेख

वर्धा/ तळेगांव (शा.पं.) येथील राष्ट्रीय महामार्गावरील टी पाईंटवर माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी काँग्रेसने केंद्रसरकार ने शेतकरी विरोधी केलेल्या तिन कायद्यांच्या निषेधार्थ तळेगांव येथे चक्काजाम आंदोलन केले . त्यानुसार शनिवारला तळेगांवातील टी. पाॅईंटवर काँग्रेसने आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
तळेगाव येथे काँग्रेसचे माजी आमदार अमरबाबु काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

केंद्र सरकारने घाईघाईने मंजूर कलेली ही विधेयके शेतकऱ्यांना संपूर्णपणे उद्धवस्त करणारी आहेत. शेतकऱ्यांना आता हमीभावाचे संरक्षण मिळणार नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने बाजार समित्यांची स्थापन केली होती. या शेतकऱ्यांच्या संस्था असून या संस्था त्यांच्यासाठी मोठा आधार आहेत, त्या संस्थाच केंद्र सरकारने मोडीत काढल्या आहेत. नव्या कायद्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांचे भले होणार आहे. शेतमाल कवडीमोल भावाने घेतला जाईल, हा मोठा धोका ओळखून शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेसने जनआंदोलन उभे केले होते.   
दुपारी १२ वाजतापासुन सुरु झालेले आंदोलन दोन वाजेपर्यंत चालले दुपारी दोन वाजता माजी आमदार अमरबाबु काळे व आर्वी विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसच्या सर्व आजी माजी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेवुन आंदोलन सोडविण्यात आले व विस्कळीत झालेली राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुक जवळपास अर्ध्या तासाच्या मशागती नंतर पोलीस बळाच्या साहय्याने सुरळीत करण्यात आली.सर्व कांग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणुन डिटेन करुन सोडुन देण्यात आले
यावेळेस पोलीस स्टेशनला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.