Home विदर्भ आर्णी येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी...

आर्णी येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी परिवार संवाद सभा संपन्न

203
0

पक्षांसाठी वेळ नसलेल्या पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाका – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – पक्षांसाठी वेळ नसलेल्या पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून, त्यांचा जागेवर नविन चेहर्‍यांना संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखी मजबूत बांधणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. महाविकास आघाडीच्या काळात कार्यकर्त्यांची मजबुत फळी तयार करून जनतेपर्यंत पोहचविण्या साठी पक्षीय स्तरावर धोरण आखण्यात आले आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे प्रतिपादन, जलसंधारण मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते आर्णी येथील माजी आमदार ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
🟣 कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ख्वाजा बेग, पुसदचे आमदार इंद्रनिल मनोहर नाईक, माजी आमदार संदीप बाजोरीया, युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, महीला जिल्हाध्यक्ष क्रांती राउत, प्रदेश सरचिटणीस नानाभाउ गाडबैले, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती निमीष मानकर आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.
🟣 या प्रसंगी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अपेक्षे पेक्षा भरपुर काही दिले आहे. त्यामुळे आता पक्षांकडून काहीही मिळण्याची अपेक्षा नाही. जिल्हाध्यक्ष पदावर काम करतांना आपण पक्षाचे ईमाने, ईतबारे कार्य केलेले असुन, एक कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी अखेर पर्यंत झटत राहू, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
🟣 या वेळी युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांनी आर्णी, केळापूर, घाटंजी, दिग्रस, दारव्हा, नेर या तालुक्यातील तालुकाध्यक्षा कडून आर्णी व दिग्रस विधानसभेचा आढावा घेतला. या प्रसंगी महीला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, युवक प्रदेशाध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर आदींचे भाषने झाली.
🟣 या वेळी आर्णी विधानसभा अध्यक्ष तथा राकाँचे जिल्हा सरचिटणीस मुबारक तंवर, घाटंजी तालुकाध्यक्ष कैलास कोरवते, दिग्रस तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, आर्णी तालुकाध्यक्ष हरिश कुडे आदींनी पक्षाचा आढावा सादर करुन, आपल्या तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समक्ष मांडल्या.
🟣 कार्यक्रमाचे संचालन आर्णी तालुकाध्यक्ष हरिश कुडे यांनी केले, तर आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परवेझ बेग यांनी मानले.