Home जळगाव कृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.

कृषी कायदे रद्द करा- आम्ही शेतकरी- आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा.

275

मानियार बिरादरी चीआर्त हाक

पंतप्रधानांना निवेदन सादर


रावेर (शरीफ शेख)

दिल्ली येथे हे भारतातील शेतकरी हे मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायद्याविरोधात ५१ दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन करीत असून भारत सरकार अद्यापही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने जळगाव येथे स्थापन झालेली संयुक्त किसान मोर्चा समितीच्या नेतृत्वात १९ ते २६जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे हे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून आज पहिला दिवस जळगाव जिल्हा मानियार बिरादरी ने आपल्या पुरुष, महिला व तरुणी सोबत सहभागी होऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

*मनियार बिरादरीचे धरणे आंदोलन*

जिल्हाधिकारी कार्यालया समक्ष सकाळी ११ वाजता पवित्र कुराणाने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी उपस्थित आंदोलकांना या तीन कायद्याची ची सविस्तर माहिती देऊन ते कसे शेतकरीविरोधी आहेत हे समजावून सांगितले तेव्हा उपस्थित आंदोलकांनी जय जवान जय किसान घोषणा देऊन, मी शेतकरी आहे,आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सह त्रिव स्वरुपाचे इतर आंदोलन करीत राहू अशी प्रतिज्ञा केली.

*आंदोलकांना यांनी केले मार्गदर्शन*

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक समाजाचे माजी अध्यक्ष गफ्फार मलिक, प्राध्यापक प्रीती लाल पवार, जिल्हा राष्ट्रवादीचे साहिल पटेल, छावा मराठा युवा चे अमोल कोल्हे, महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा चे मुकुंद सपकाळे, वंचित बहुजन महिला आघाडी रेखा शिरसाळे ,काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते मुफ्ती हारून नदवी ,लोकसंघर्ष मोर्चा चे हरिश्चंद्र सोनवणे ,वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हा सचिव फिरोजा शेख, आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

*आंदोलनस्थळी यांची होती उपस्थिती*

मानियार बिरादरीचे धरणे आंदोलनात जळगाव बिरादरीचे सय्यद चाँद, हारून शेख, सलीम मोहम्मद ,सादिक मुसा , नंदुरबार चे अब्दुल बारी,मुक्ताई नगर चे हकीम चौधरी,भुसावळ चे साबीर शेख, नशिराबाद चे अझीझ शेख,महमूद शेख,चाँद खाटीक,अय्युब शेख, जळगाव चे अजिज शेख, अब्दुल रहीम ,अल्ताफ शेख हसन ,शेख अकिल मणियार ,तर महिला प्रतिनिधी म्हणून सबनूर बी शेख हैदर ,सुलताना बी शेख युनुस, अमिनाबी शेख कासम, जुबेदा बी सय्यद चांद, रुबीना शेख इक्रम ,सय्यद शहेनज बी साबीर, शबीना सय्यद हरीश , जवेरीया सय्यद हरिश, फर्जाना शेख ,तर वंचित बहुजन आघाडीच्या पंचशीला आरक ,संगीता मोरे ,सुजाता ठाकुर, जनक्रांती चे सुरेश तायडे ,साहेबराव वानखेडे युवराज सोनवणे ,हरिश्चंद्र सोनवणे लक्ष्मण कोळी, प्रा प्रीती लाल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझर पठाण, मरकाज फाऊंडेशनचे मुजाहिद खान, जितेंद्र केदारे ,अप्पा पुंडलिक साबळे, हमीद शेख कालू, रमेश सोनवणे, आसिफ शेख ,शेख वसीम, रोहन देशमुख ,रेहान सय्यद, अबू सुफियान बागवान, आयाझ हुसेन, मुस्‍तकीम शेख मुसा, सय्यद मोहसीन ,श्रीकांत मोरे ,आरिफ शेख आदींची उपस्थिती होती

*पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर*

हिंदी मधील दोन पानी निवेदन त्यात या तिघी काळे कायदे रद्द करा याबाबतची मागणी चे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना जुबेदा सैयद,सबनुर बी शेख हैदर, सुलताना बी शेख युनुस, अमिना बी शेख कासम, सय्यद हरीश, सैय्यद साबीर ,यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी निवेदनाचे वाचन केले व आमच्या त्रिव भावना आपण केंद्र शासनाला कळवा अशी विनंती केली.
अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन यांनी आपल्या भावना शासनाला कळवितो असे आश्वासन दिले

*आंदोलन स्थळाचे क्षणचित्रे*
१)आंदोलकांच्या डोक्यावर टोप्या घातलेल्या होत्या व त्यावर लिहिले होते *मै किसान हू*
दुसर्‍या बाजूला इंग्रजीत जीत लिहले होते *आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहोत*
२) आंदोलनात अब्दुल ट्रान्सपोर्ट वर आलेले कर्नाटकचे शेतकरी उपस्थित होते.
२) मानियार बिरादरीचे अध्यक्ष यांनी स्वतः धोती कुडता व टोपी घालून शेतकऱ्यांचा पोशाख परिधान केलेला होता.

४)गुलाब बागवान या शेतकऱ्याने आंदोलकांना आंदोलनस्थळी केळी चे वाटप केले.

५)आंदोलनस्थळी हिंदू-मुस्लीम एकत्रित बसल्याने राष्ट्रीय एकात्मता चे प्रतीक दिसून येत होते.