
तालुका संघटक दिनानाथ दुधाटे यांच्या एकाच घरातील 3 उमेदवारांचा विजय
परभणी/ प्रतिनिधी
ताडकळस येथून जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पूर्णा तालुका संघटक दिनानाथ दुधाटे यांनी मागील निवडणुकीत तिन मताने झालेल्या पराभवाचा वचपा काढून या निवडणूकत स्वत:च्या घरातीलच 3 उमेदवारांचा विजय मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्वप्रस्थापीत केले आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या माध्यमातुन दिनानाथ दुधाटे यांनी गेली पाच वर्ष गावच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सन 2014-15 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत दुधाटे यांच्या नेतृत्वातच निवडणुक लढली होती. परंतु त्यांच्या सर्व पॅनलचा विजय झाला परंतु त्यांना वयक्तीक अवघ्या तिन मताने पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाने खचून न जाता दिनानाथ दुधाटे यांनी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाली देऊळगाव दुधाटे येथे मित्रमंडळाचे संघटन मजबुत केले. गावातील सर्व नागरीकांना विकासाची हमी देवून जनमत मिळवण्यासाठी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय जनतेस सोबत घेवून कामे करण्यास प्राधान्य दिले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दिनानाथ दुधाटे यांनी गावातील इतर पक्षाच्या तरुण नेतृत्वांची फळी सोबत घेवून जनशक्ती-ग्रामसमृध्दी पॅनलची स्थापना करुन निवडणूक लढवली. यात पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला. गावच्या तरुणांच्या हाती सत्ता खेचून आणण्यासाठी दिनानाथ दुधाटे यांची भुमिका महत्वाची असल्याचे मत गावकरी व्यक्त करतात. निवडणुकीला सामोरे जाताना दुधाटे यांनी गावच्या विकासाचा मुलभुत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विश्वास गावकऱ्यांना दिला आहे. शांत व संयमी सर्वसमावेशी नेतृत्व म्हणुन दिनानाथ दुधाटे यांच्याकडे पाहिल्या जाते. त्यामुळे त्यांच्याच घरातील तिन सदस्य प्रभाग क्र.१ मधुन मोठा भाऊ डिगंबर दुधाटे , तर प्रभाग क्र.4 मधुन पत्नी प्रभावती दुधाटे यांचा विजय झाला दिनानाथ दुधाटे यांच्या नेतृत्व व कर्तृत्व कुशलतेचे गावकऱ्यांयांमधुन कौतुक होत असुन सर्व आजी माजी पदाधिकारी, नेते, जेष्ठ नागरीक यांचे भक्कम पाठबळ मिळाले असल्यानेच हा विजय झाला असून हा विजय जनतेचा गावकऱ्यांचा मतदार बंधु-भगीनींचा असल्याचे मत दिनानाथ दुधाटे यांनी विजयानंतर बोलताना व्यक्त केले .











































