Home विदर्भ पारवा येथे सामाजिक कार्यकर्त्या कडून कोरोना योद्धांचा सत्कार

पारवा येथे सामाजिक कार्यकर्त्या कडून कोरोना योद्धांचा सत्कार

42
0

वाढदिवसाचे औचित्य साधून केला सत्कार

यवतमाळ / घाटंजी , (तालुका प्रतिनिधी) – देशासह अख्ख्या जगात थैमान घातलेल्या कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, विज वितरण कंपनी मधील अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव यांचा सत्कार घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू चव्हाण यांचे चिरंजीव समर चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गणेश मुद्दलवार सैय्यद जावेद सैयद अमीर हे एकत्र येत कोरोना योद्धा चा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुष्गुच्छ देवून कोरोना चे सर्व नियम पाळत सत्कार करण्यात आला.
अख्ख्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावत जनतेत जन जागृती करून त्यांना धीर देत अहोरात्र मेहनत घेवून पारवा सर्कल मध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविले एवढेच नव्हे तर अनेक अडचणी ना पुढे जात आपले कार्य चोखपणे बजावले व ते आजही त्याच जोमाने कार्यरत आहे. याच बरोबरीला अनेक समस्या असताना वीजवितरण कंपनीने सुध्दा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवला. सोबत पोलिस प्रशासनाने उत्तम कार्य बजावले याशिवाय पत्रकार बांधवांचे सुध्दा मोठे योगदान राहिले. पत्रकार संघटनेतील गणेश भोयर यांनी विकास गंगा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लॉक डाऊन काळात गरीब जनतेला अन्नदानाचे अविरत १०० दिवस कार्य केले. त्यामुळे या योद्धा चा कुठे तरी सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे हा उदांत हेतू पुढे ठेवून दोन जातीतील सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू चव्हाण यांचे चिरंजीव समर चव्हाण यांच्या वाढदवसानिमित्त नववर्षाचा मुहर्त साधत सैय्यद जावेद व गणेश मुद्दलवार मित्र परिवाराने सत्कार कार्यक्रम घडवून आणला. या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजय पुराम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विज वितरण चे कनिष्ठ अभियंता ए. के. इंगोले, पोलीस कॉन्सटेबल रमेश बडेवार, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर अक्कलवार, डॉ. वर्षा मनवर, डॉ. रोहिणी केंद्रे, डॉ. पूजा मानकर, डॉ. होडगिर, डॉ. होडगे हे होते. कोरोना हे अजूनही गेलेला नसून जनतेने योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. यावर काय काळजी घेतली पाहिजे याबाबत विस्तृत माहिती आपल्या मार्गदर्शनातून अध्यक्ष स्थानावरून दिली यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू चव्हाण, गणेश भोयर, पांडुरंग निवल, दिनेश गाऊत्रे, नारायण गटलेवार यांचे सह सत्कार मूर्ती पारवाआरोग्य केंद्र अंतर्गत मधील सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, वीज वितरण कंपनी चे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गाऊत्रे यांनी केले तर प्रस्तावना गणेश मुद्दलवार यांनी केले.