
रावेर (शरीफ शेख)
सामाजिक कार्यकर्ते जहागीर खान यांच्या वाढ दिवसानिमित तसेच साप्ताहिक जळगांव दर्पणच्या वर्धापण दिनानिमित्त व जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जळगाव येथे पत्रकार भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन सौ सना जहांगीर खान यांनी केले होते. तसेच साप्ताहिक जळगांव दर्पणच्या वर्धापन दिनाच्या अंकाचे यावेळी आमदार सुरेश दामू भोळे (राजु मामा )यांच्या उपस्थितीमध्ये याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. तसेच या वेळी मणियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारूक शेख , माजी उपमहापौर करीम सालार , काँग्रेस युवक शहर अध्यक्ष अमजद पठाण, जळगांव दर्पणच्या संपादिका सना खान, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अक्रम तेली , राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे मजहर पठाण , सर सय्यद खा लायब्ररी चे सचिव अब्दुल राउफ शेख , अकबर काकर, अल्पसंख्याक महिला जिल्हाध्यक्ष आयेशा मणियार, हकीम चौधरी , डॉ महेंद्र काबरा, रेड क्रॉस चे गनी मेमन ,सलीम इनामदार डॉ.शाकीर शेख, अल्पसंख्यांक जिल्हा महासचिव जुनेद एम खान, आदीची यावेळी उपस्थिती होती. सुत्रसंचलन अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केले….











































