Home महत्वाची बातमी अट्टल मोबाईल चोरट्यास गुन्हा शाखेने ठोकल्या बेड्या ,

अट्टल मोबाईल चोरट्यास गुन्हा शाखेने ठोकल्या बेड्या ,

89

 

चोरीचे महागडे मोबाईल जप्त ,

आरोपीस अटक ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

आठवडी बाजारांतील गर्दीचा फायदा घेत तब्बल 24 महागडे स्मार्टफोन चोरणाऱ्याच्या मुसक्या अखेर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या आहेत . महागडे मोबाईल चोरायचे अन् कमी किमतीत विकायचे हा त्याचा उद्योगच झाला होता . नीलेश जगन शिंदे ( रा . धानोरी , ता . चिखली ) असे या ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे . सायबर क्राईम विभागाने दिलेल्या तांत्रिक माहितीवरुन एलसीबीने जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन जणांना ताब्यात घेत त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली . त्यांच्याजवळ असलेले दोन्ही चोरीचे मोबाईल त्यांनी नीलेश जगन शिंदे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली . तपास पथकाने नीलेशला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने जिल्ह्यातील विविध आठवडी बाजारांत गर्दीचा फायदा घेत 24 अँड्रॉइड फोन चोरल्याची कबुली दिली . त्याच्याकडून 24 स्मार्टफोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 2 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या नेतृत्त्वात सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे , नागेशकुमार चतरकर , पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके , श्रीकांत जिंदमवार , प्रदीप आढाव , पोलीस अंमलदार संजय मिसाळ , गजानन आहेर , भारत जंगले , विजय सोनोने , विजय वारुळे , सायबर पोलीस ठाण्यातील राजू आडवे , कैलास ठोंबरे यांनी पार पाडली .