Home नांदेड राऊतखेडा येथील प्रस्थापितांच्या विरोधात तरुणाईचे बंड 

राऊतखेडा येथील प्रस्थापितांच्या विरोधात तरुणाईचे बंड 

50
0

अर्ज दाखल केलेले राऊतखेडा ग्रामपंचायत साठी तरुण उमेदवार सुमित बारादे ,अमर टोकलवाड, संजय डिकळे , रावसाहेब सुर्यवंशी ,गजानन तागमपुरे व बाबुराव शिंदगे

नांदेड , (प्रशांत बारादे) – यंदाच्या निवडणुकीत तरुणाईचा उत्साह पाहता राऊतखेडा गावातील प्रस्थापित नेत्यांसमोर तरुण वर्गाचे मोठे आव्हान आहे .एरवी राजकारण म्हटले की घराणेशाही आली गावात एकाच कुटूंबात अथवा ठराविक लोकांच्या हातात सत्ता एकवटलेली असते .याच विषयाला धरून राऊतखेडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे नवीन पिढी आकर्षित झाली असून गावातील तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसून येत आहेत .”थोरांच्या नाही तर पोरांच्या हातात ग्रामपंचायत द्या ” असे म्हणत तरुण व उच्च ७शिक्षित पिढीने गावातील प्रस्थापिता विरोधात मोठे आव्हान उभे केले आहे .

 

 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवीन पिढीला संधी मिळणे दुरापास्त झाले आहे.त्यामुळे गावातील प्रस्थापित लोकांना त्यांची जागा दाखवून देऊ व एकदाची खोड मोडावीच लागणार असे सूर चावडीवरच्या, मैदानावरच्या ,सोशल मिडीयाच्या गप्पांमधून निघत आहेत .डिजिटल युगातील तरुणाई वेगवेगळे व्हिजन घेऊन ग्रामपंचायतीच्या राजकारणात येऊ पाहत आहेत .परिणामी येणाऱ्या राऊतखेडा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तरुण वर्ग उमेदवार मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याने हे तरुणाईचे उभे केलेले बंड शमविण्यासाठी प्रस्थापितांचि कसोटी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीत लागणार आहे हे तितकेच खरे आहे .