Home मराठवाडा सिद्धेश्वर पिंपळगाव येथे पुजाऱ्यास मारहाण

सिद्धेश्वर पिंपळगाव येथे पुजाऱ्यास मारहाण

56
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील पुजारी लक्ष्मीकांत कुलकर्णी यांना दिनांक २९ च्या सकाळी परमेश्वर आसाराम डोंगरे यांनी फोन करुन आमच्या शेतात दत्तजयंती निमित्त शेतात अभिषेक करायचाआहे, सागूंन बोलावून घेतले.
हनुमान मंदीरासमोर सिद्धेश्वर पिंपळगाव येथे पुजारी कुलकर्णी यांनी दक्षणाचे काय असे विचारताच वरील एक व अन्य तिघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.म्हणून गोंदी पोलीस ठाण्यात कलम ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास जमादार दासर हे करीत आहेत.
या ठिकाणी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी भेट दिली.