Home जळगाव रनिंग, सायकलिंग व योगाद्वारे नूतन वर्षाचे स्वागत….!

रनिंग, सायकलिंग व योगाद्वारे नूतन वर्षाचे स्वागत….!

132

लियाकत शाह

भुसावळ येथील १ जानेवारी रोजी नूतन वर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने करीत असतो. भुसावळ स्पोर्टस् अँन्ड रनर्स असोसिएशनच्या काही प्रातिनिधिक सदस्यांनी रनिंग, सायकलिंग व योगा या विविध उपक्रमाद्वारे नूतन वर्षाचे स्वागत केले व संपूर्ण भुसावळवासियांसाठी २०२१ हे वर्ष आरोग्यमय जावो अशी सदिच्छा दिली. शुक्रवार १ जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या पहाटे भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनचे प्रवीण फालक, डॉ तुषार पाटील, डॉ चारूलता पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण वारके, रणजित खरारे, ब्रिजेश लाहोटी, गणसिंग पाटील, सचिन अग्रवाल, डॉ स्वाती फालक, रूचा फालक, अंकित पोद्दार, निलेश लाहोटी, नकुल असावा आदी सदस्यांनी प्रथम डिआरएम ऑफिस कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्रपणे व शारीरिक अंतराचे पालन करीत योगासनास सुरुवात केली. त्यात वॉर्म अप या प्रकाराचा समावेश होता. त्यानंतर या सदस्यांनी आरपीडी रोडवर पाच ते सात किलोमीटर रनिंग केले. त्यानंतर पुन्हा स्ट्रेचिंग व्यायाम प्रकाराद्वारे योगा व त्यानंतर सायकलिंग केले. कोरोना कालात देखील सर्व सदस्यांनी आपापले व्यायाम प्रकार सुरू ठेवावे व यावर्षीदेखील सरकारी नियमांचे पालन करून भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशन भुसावळ शहरातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करेल असे श्री प्रवीण फालक यावेळी म्हणाले. करोना काळात सर्वाधिक जबाबदारी घरातील महिलांवर होती. अशाही काळात काही महिलांनी आपले आरोग्य जपले. त्याचप्रमाणे शक्य असल्यास महिलांनी पायी फिरणे, रनिंग, योगा, दोरीवरील उड्या इत्यादी व्यायाम प्रकार करावे व आपल्या सोबतच कुटुंबाचे आरोग्य जपावे असे डॉ चारुलता पाटील यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात सदस्यांनी सर्व सरकारी नियमांचे पालन करीत गच्चीवर अथवा अंगणात धावणे, घरी व्यायाम व योगा आदी व्यायाम प्रकाराद्वारे आपले फिटनेस कायम ठेवले व या कठीण काळात शिस्त राखून या संकटाला आपण कसे धैर्याने सामोरे जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्सच्या सदस्यांनी भुसावळच्या नागरिकांसाठी दिले असे श्री प्रवीण पाटील यांनी सांगितले. त्याप्रमाणे सरकार व प्रशासनाची परवानगी असल्यास कोरोनासंबंधीचे नियम मास्क, शारीरिक अंतर, सँनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करून सर्व सदस्य लवकरच एकत्र धावतील अशी ग्वाही त्यांनी दिली. याखेरीज इतर सदस्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे धावून नूतन वर्षाचे स्वागत केले. यात प्रामुख्याने तरुण बिरीया, डॉ. निर्मल बलके, सुनील सोनगिरे, संजय भदाणे, मुकेश चौधरी, संतोष घाडगे, कैलास खापरे यांनी २१ किलोमीटर धावून नवीन वर्षाचा आनंद साजरा केला.