Home जळगाव “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी

30
0

मुक्ताईनगर येथील समस्त मुस्लिम समाजाची मागणी

शरीफ शेख

रावेर , दि. १४ :- मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाज तर्फे मा.राष्ट्रपती यांना तहेसीलदार याच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की., दिल्लीत झालेल्या संत संमेलनात “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाचे पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजपचे नेत्याचे उपस्थित नुकतेच प्रकाशन करण्यात आले,भाजपचे नेते जय भगवान गोएल यांनी हे पुस्तक लिहिले आहे,या पुस्तकात महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बरोबर भाजपचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तुलना केल्याने भाजपचे नेते जय भगवान गोएल यांचे वर कडक करवाई करावी व त्यांच्या ह्या भोर कृत्य मुळे भारतातील सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराज वर प्रेम करणाऱ्या बांधव चे भावना दूखल्या गेल्याने आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव यांचा तिव्र निषेध करीत असून सदर पुस्तकाचे लेखक भगवान गोएल यांचे वर कडक कार्यवाही व्हावी व पुस्तकांचे प्रकाशन त्वरित थांबावे असे निवेदन देण्यात आले ,या वेळी मनियार बिरादरी चे हकीम चौधरी,कॉंग्रेस चे जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईल खान,मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम,शिव सेना जिल्हा संघटक अफसर खान,वर्तमानसार चे गंगाधर बोदडे,आतिक खान,आसिफ शेख उस्मान,रिजवान चौधरी,शेख असगर शेख,सादिक खाटीक,अहेमद ठेकेदार,वसीम कुरेशी,मुख्तार रबाणी आदि उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting