Home मुंबई अनधिकृत बांधकामांची तक्रारीचा पाठपुरावा केला म्हणून पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी.. पत्रकार संरक्षण...

अनधिकृत बांधकामांची तक्रारीचा पाठपुरावा केला म्हणून पत्रकाराला शिवीगाळ करून धमकी.. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कार्यवाही न करता समतानगर पोलीस ठाणे मध्ये अदखल गुन्हा दखल.

144

प्रतिनिधी – रवि गवळी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बौद्ध कॉलनी,बुद्ध विहार शेजारी एम डी रोड कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ या ठिकाणी g+२ आहे अनधिकृत कमर्शियल गाळ्याचे बांधकाम शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या परवानग्या न घेता बांधकाम निर्माण करणारे ठेकेदार सुमित वाघ याची अनधिकृत बांधकामाची लेखी तक्रार आर साउथ विभाग मनपाला कांदिवली येथे केली असता सदर ठेकेदारांने सिद्धार्थ काळे यांनी तक्रार केली आहे म्हणून ठेकेदार सुमित वाघ यांनी दिनांक 02/12/ 2020 रोजी सिद्धार्थ काळे हे बारक्या रामा कंपाऊंड लास्ट बस स्टॉप याठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संरक्षण व सुशोभीकरण या मागणीसाठी आमरण उपोषण करत असताना 10:56 वाजता ठेकेदार सुमित वाघ यांनी सिद्धार्थ काळे यांना फोन करून शिवीगाळ केली त्यांना धमकावले, त्यानंतर सिद्धार्थ काळे यांनी पोलीस कंट्रोल 100 नंबर डायल करून उपोषण स्थळावरून संपूर्ण माहिती दिली असता संबंधित पोलीस कंट्रोल रूम मधून त्यांना सदर हद्दीमधील समतानगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंद करण्यासाठी सांगितले त्यानंतर उपोषणाची सांगता झाली सिद्धार्थ काळे समता नगर पोलीस ठाणे मध्ये जाऊन सदर ठेकेदाराच्या विरोधामध्ये तक्रार नोंद केली आहे. पत्रकार सिद्धार्थ काळे हे नेहमी ज्या ठिकाणी शासनाची धोकाधडी होते व नेहमीं शासनाला महानगरपालिकेला दक्ष नागरिक व दक्ष पत्रकार या नात्याने वेळोवेळी सहकार्य करत असतात त्यामुळे सिद्धार्थ काळे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला. आमच्या प्रतिनिधीने पत्रकार सिद्धार्थ काळे यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांची सदर ठेकेदार सुमित वाघ यांच्यावर कडक पोलीस कारवाई करून एमआरटीपी अंतर्गत नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिद्धार्थ काळे व महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी केले आहे. सुमित वाघ याचे स्वतः चे घर सुद्धा अनधिकृत बांधकाम केले आहे व समोरच एक दोन मजली बांधकाम सुद्धा केले आहे. सुमित वाघ याच्या कडे मनाप किंवा शासनाचे कुठले ही लायसन्स नाही त्यामुळे सुमित वाघ व सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवार व्हावी अशी मागणी होत आहे.