Home मराठवाडा खरेदीदारांची फसवणूक , “अधिकारी मालामाल”

खरेदीदारांची फसवणूक , “अधिकारी मालामाल”

51
0

शहरात पुन्हा भूमाफियांनी बनावटगिरी सुरू केली आहे.शासनाच्या नियमानुसार खुल्या प्लॉटची रचना न करता व जागेचा ‘एनए’ न जोडता खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात सुरू आहेत.यातून रजिष्ट्री कार्यलयातील अधिकारी मालामाल होत असून प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्र न जोडल्याने न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याचे खरेदीदाराच्या मानगुटीवर टांगती तलवार कायम आहे.त्यामुळे पक्षकाराची फसवणूक होत असल्याचा प्रकार रजिष्ट्री अधिकाऱयांना दिसत नाही का असे सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे.

शहर परिसर तसेच उपनगरात प्लॉट खरेदी करण्यासाठी लोकांचा ओघ सुरू आहे.तांदुळवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११० चार दिवसातच १० ते १२ प्लॉट खरेदीचे व्यवहार झाले आहेत.प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करतेवेळी संबंधितांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले आहे.प्लॉटची रचना करतेवेळी यामध्ये वीज,पाणी,रस्ते या मूलभूत सुविधेबाबत विचार करणे आवश्यक आहे.शिवाय ओरिजनल एने-लेआऊट नकाशा जोडणे आवश्यक आहे.प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला शासनाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत का याची खात्री दुय्यम निबंधक अधिकारी (रजिष्ट्री) यांनी करणे बंधनकारक असताना सर्व नियम पायदळी तुडविल्याचा प्रकार घडला आहे.
सध्या शहरात भूमाफियांनी हौदोस घातला आहे.मोक्याच्या ठिकाणी लोकांना भुरळ पडेल अशी जागा दाखवून प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार जोरदार सुरु अहेत.शहरातील तांदुळवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११० मध्ये अशाच प्रकार समोर आला आहे.प्लॉट मालकांना वरसाहक्कातून जमिन मिळाली आहे.नियमबाह्य त्याचे प्लॉट पाडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेला एनए लेआऊट जोडून विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोयाबीन उसबिले आदींमुळे लोकांची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे.शहरात प्लॉट खरेदीच्या माध्यमातून गुतुवणूक करण्याचा विचार सर्रास लोक करीत आहेत. भूमाफिया व रजिष्ट्री अधिकाऱ्यांच्या संगनमताने पक्षकारांना भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे प्रकार सुरू आहेत.

सतीश टोणगे
9422936081