Home महत्वाची बातमी आयएएस अधिकारी श्याम तागडे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर केलेल्या निराधार आरोपांचे खंडन.

आयएएस अधिकारी श्याम तागडे यांच्या माध्यमातून त्यांच्यावर केलेल्या निराधार आरोपांचे खंडन.

151
0

 

( विशेष एक्सलुझिव रिपोर्ट 🙂

 के. रवि (दादा ),,

देश किंवा राज्य जीथे उच्च सरकारी अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. तिथेच, कुठल्या तरी मार्गाने काही असंतोषजनक लोक काही ना काही मुद्दे शोधून समाज आणि सरकारच्या नजरेत त्यांची बदनामी करण्याचा ही कट रचत असतात.
आता हे ही वाचा की महाराष्ट्र राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील आयएएस अधिकारी श्याम तागडे जे अत्यंत नम्र, साधे, प्रामाणिक सरकारी नोकरी करूनही सरकार व समाजात आपले नाव स्थापित करु शकले आहेत , ते ही अगदी कुठल्याही प्रसिद्धि शिवाय . मागील 3 महिन्यांपासून महाराष्ट्र
राज्याच्या न्याय आणि कायदा विभागात कार्यरत असलेल्या हया आईईएस अधीकारीच्या उच्चशिक्षित मुलाला लक्ष्य करून त्याना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे . ते म्हणतात ना, जिथे चांगुलपणा वाढतो, तिथे वाईट गोष्टी देखील डोकावतात.
त्याचप्रकारे, कोरोनाचे संसर्ग आणि गंभीर संकटाला तोंड देत असतानाही राज्य सरकारसमोर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना ही श्याम तागडे यांनी संपूर्ण प्रामाणिकपणाने राज्यातील सर्वांगीण चांगले करण्याचे प्रयत्न केले आणि तरी काहीं विघ्नसंतोषी लोक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही, ज्याने काहीही चुकीचे केले नाही त्याला भीती कशाची .
तेच सत्य डोळ्यासमोर ठेवून श्याम तागडे जी यांनी स्वत: वर उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नाचे खंडन केला . ते म्हणतात:

१) मुद्दा अगदी सोपा आहे. गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की जे विद्यार्थी कोणत्याही गुणवत्तेनुसार १ ते १०० क्रमांकासह कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळवू शकतील अशा विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही मर्यादा राहणार नाही.

२) म्हणूनच ज्या विद्यार्थ्याने प्रवेश मिळविला आहे, असे विद्यापीठ 1 ते 100 पर्यंतचे क्यूएस रँकिंगसह आहे, त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाची पर्वा न करता ही शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र आहे.

3 ) माझ्या मुलाने सिडनी युनीमध्ये प्रवेश घेतला आहे, ज्यांचे वर्ल्ड क्यूएस रँकिंग 42 आहे. म्हणूनच, त्यानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि गुणवत्तेच्या आधारे त्याची निवड झाली आहे.

4 ) माझ्या मुलाने 17 ऑगस्ट 2020 रोजी सामाजिक न्याय विभागात प्रवेश घेण्यापूर्वी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता.

5 ) जेव्हा मी या विभागात रुजू झालो, तेव्हा मी सरकारला लेखी कळविले की माझ्या मुलाने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे आणि मला निवड समितीच्या सभांमध्ये अध्यक्षपदी रहता येनार नाही.

6 ) म्हणूनच, निवड समितीच्या अध्यक्षांची जबाबदारी अन्य सचिवला देण्यात आली आणि त्या सचिवच्या अध्यक्षतेखालील समितीने ती निश्चित केली .
मुलाच्या निवडण्यात माझी कोणतीही भूमिका नव्हती.

7 ) म्हणूनच या शिष्यवृत्तीसाठी माझा मुलगा निवडण्यात माझी कोणतीही भूमिका नव्हती. स्वतंत्र निवड समितीने गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड केली आहे.

8 ) ही योजना पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. माझा मुलगा पात्र होता. म्हणूनच, त्याला दुसर्‍या एखाद्याची शिष्यवृत्ती मिळाली असे म्हणणे चुकीचे आहे. त्याला जे हवे ते मेरिटनेच मिळाले आहे .

9 ) मी ना निवडीचा पक्ष नव्हतो किंवा मी या धोरणात भाग घेण्यास तैयार ही नव्हतो .

१०.) माझ्यावर गैरवर्तनाचे आरोप निराधार आहेत.

तसे, हे आवश्यक नाही की सर्व सरकारी अधिकारी, जे
आईएएस आहेत किंवा लिपिक आहेत, ते भ्रष्ट आहेत. काहिनी तर करोड़ोंनी मलाई डकारली .
अलीकडेच पानीपतकार म्हणून ओळखले जाणारे पूर्व आईएएस अधिकारी विश्वास पाटीलनां
एसआरएतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाल्याच्या प्रकरणात कोर्टाने केवळ बिल्डरांना गरीबांच्या जागेचे हस्तांतर केल्या गेल्याच्या बाबतीत हस्तक्षेप केल्याच्या आरोपावरून चौ कशीचे आदेश दिले आहेत.

विशेषतः असे म्हणावे लागेल की देश व राज्यात असे अनेक मागासवर्गीय अधिकारी मोठ्या पदानवर बसले आहेत, त्यापैकी बोटांवर मोजले जाणारे इतकेच अधिकारी हे सरकारचे , राज्याचे तसेच समाजाचे भले बघतात . असे करणे काय कायदेशीर गुन्हा नाही. प्रत्येक साध्या च्या मानसाने आणि खास च्या खास मामसाने स्वता: सहित आपल्या कुटुंब, नातेवाईक, देश, राज्य आणि समाजा च्या प्रगति करिता पुढे आले पाहिजे.
परंतु या मागासवर्गीय सोसायटीतील बहुतेक अधिकारी असे आहेत ज्यांना आपल्या समाजातील लोकांनाच भेटायला वेळ नसतो. आणि ना वेळ काढतात आणि त्या सोसायटीच्या सहकारयाला परत बोलवुन संपर्क करतात .
जर ते युगात असेच वागत
बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की मला समाजासाठी वेळ नाही , आनी त्या वेलेस त्यानी जर पत्रे सरकारचा हाथ पकड़ला असता तर समाजास भेंटन्या करिता वेल नाही असे वागणारे मागास समाजाचे समाजाचे हे
उच्चपदस्थ मध्यमवर्गीय
अधिकारी झाले असते का ? काधिच नाही . परंतु सत्य हे आहे की त्यांच्याकडे समाजासाठी वेळ नाही. हे दुर्दैवी आहे.
*
*येथे आम्ही हे विशेष सांगू इच्छित आहोत की आम्ही कोणालाही बदनाम करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरत नाही.*

*ज्याप्रमाणे समाजात श्याम तागडे यांच्यासारखे सुसंस्कृत अधिकारी आहेत, त्याच समाजातही अनेक कलंकित अधिकारी ही आहेत. तर कुणीही यांस कृपया ते खाजगी घेऊ नका .**