Home सोलापुर योग, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद प्रसारासाठी आयुष भारत ची मोठी योजना

योग, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद प्रसारासाठी आयुष भारत ची मोठी योजना

152
0

सोलापूर : प्रतिनिधी

आयुष भारत या योजनेअंतर्गत आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, होमिओपथी, युनानी उपचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार जिल्हा व प्राथमिक विभात व देशातील गावागावात तयारी सुरू झाली असून या भागातील रूग्णालये या प्रकारच्या उपचारांसाठी सज्ज केली जात असल्याचे समजते. जिल्हा व प्राथमिक केंद्रे व रूग्णालये आयुष भारत मध्ये लिंक करून तेथे सर्वत्र आयुर्वेद, युनानी, नॅचरोपथी व होमिओपथी उपचार सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आयुष भारत ची आयुष कीटही वितरीत केली जाणार आहेत. ही कीट वापरण्याचे प्रशिक्षण आशा कार्यकर्त्यांना दिले जात असल्याचेही समजते. याचबरेाबर देशात आयुष भारत हेल्थ येाजना नोव्हेंबर २०२० पासून लागू करत आहे. रूग्णांना स्वस्त औषधे मिळावीत यासाठी देशात व गावागावात नॅचरोपथी स्टोअर्सही सुरू केली जाणार आहेत. सध्या आता अशा प्रकारची देशात १०० स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत.