Home जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

83
0

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील व शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या. कार्याध्यक्षपदी- मयुर पाटील, संघटक- रोहित पाटील, उपाध्यक्ष- गिरीष पाटील, शुभम सैंदाने, सागर सुर्यवंशी, चेतन पाटील, सरचिटणीस- गौरव पवार, अंकित काटे, सचिव- गिरीष पाटील, सचिन पाटील, कृष्णा बोरसे, शहर कार्याध्यक्ष- सनी गायकवाड, शहर उपाध्यक्ष- निखिल चव्हाण, मनिष महाजन, सिद्धेश पाटील, शहर सरचिटणीस- शुभम सुर्यवंशी, यशोदीप पाटील, निखील बागुल, शहर संघटक- दुर्गेश साळुंखे, शहर सचिव- मनोज ठाकरे, देव गोसावी, सौरभ भावसार आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी जेष्ठ कामगार नेते एल.टी.पाटील, डॉ.रामराव पाटील भरवस, युवक तालुकाध्यक्ष विनोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नवनिर्वाचित शहर कार्याध्यक्ष सनी गायकवाड यांनी केले, कार्यक्रमास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.