Home मराठवाडा मेरी आवाज सुनो’ म्हणत तरूणाने पेटवून घेतले.

मेरी आवाज सुनो’ म्हणत तरूणाने पेटवून घेतले.

648
0

भ्रष्टाचार सर्वत्रच बरबटलाय,न्याय मागायचा कुणाकडे?

 

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  गावाचा विकास करण्यासाठी आलेल्या पैशाचा अनियमित खर्च, कागदोपत्री बोगस कामे करून गावावर अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार केला,या प्रवृत्तीला विरोध तसेच भ्रष्टाचाराला विरोध करत न्याय्य मागणी करण्यासाठी ,आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे वेळोवेळी विनंती करूनही दखल घेतली नाही . म्हणून रुई तालुका अंबड, जिल्हा जालना येथील दिलीप राजगुरू यांनी आयुक्त कार्यालयात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रूई येथील पिडीत दिलीप राजगुरू यांच्या राहत्या घरी जाऊन या प्रकरणाची चौकशी, विचारपूस करून धीर देण्यासाठी श्री दिनकर उघडे, श्री प्रल्हाद दहिभाते, श्री देवा चित्राल यांनी भेट दिली.

वडील श्री धुराजी पंढरीनाथ राजगुरू, पत्नी श्रीमती मिना दिलीप राजगुरू, बहीण श्रीमती कुशावर्त डवारे, मुले तुषार राजगुरू, विशाल राजगुरू, श्री संदीप राजगुरू, श्री कृष्णा डवारे, श्री दशरथ राजगुरू, श्री अर्जुन मुळे, श्री संतोष डवारे, श्री रामेश्वर राजगुरू, श्री ज्ञानेश्वर राजगुरू, श्री पवन राजगुरू, श्री भानुदास राजगुरू, श्री नामदेव गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मदतीने न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.