Home जळगाव डॉ. शरीफ शेख बागवान कोरोना वीर पुरस्काराने सन्मानित .

डॉ. शरीफ शेख बागवान कोरोना वीर पुरस्काराने सन्मानित .

62
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील कर्तव्य बहुद्देशीय संस्था द्वारे कोरोना महाकाल मध्ये विशेष सेवा बजावणारे योधांना संस्थाच्या वतीने जळगाव येथे छोटे खानी कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित केले . त्यात जळगाव येथील अमन रोटरी फाउंडेशन चे अध्यक्ष , बी. वी न्युज २४ चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शरीफ शेख बागवान यांना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी व डॉ. महेंद्र काबरा यांचा हस्ते कोरोनवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी स्वामी समर्थ ग्रूपचे अध्यक्ष तथा ग. स. अध्यक्ष मनोज पाटील काबरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेंद्र काबरा , शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार , दिशा स्पर्धा परीक्षा संचालक वासुदेव पाटील , स्वामी समर्थ ग्रूपच्या संचालिका प्रतीक्षा पाटील , सूर्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी , पत्रकार पल्लवी भोंगे , कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी , मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख , सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली देवरे आदी उपस्थित होते .या पूर्वी अनेक संस्थांनी कोरोना योद्धा प्रमाण पत्र दिलेले असून राज्यस्तरीय मोलाना आजाद आदर्श समाज सेवक पुरस्कार मिळालेले आहे . रोटरी क्लब चे पोलिओ डिस्ट्रिक्ट अवॉर्ड मिळालेले आहे . महाराष्ट्र गौरव पुरस्कार घोषित , अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी , अखिल भातीय जर्नालिस्ट फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष आणि अन्याय अत्याचार भ्रष्टचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष आहे . हा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातील मित्र – परिवारात कौतुक केले जात आहे .