Home विदर्भ नागपूर रोड बायपासवर पसरलेले घाणीचे साम्राज्य,अल्पसंख्याक समाजाचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात…!

नागपूर रोड बायपासवर पसरलेले घाणीचे साम्राज्य,अल्पसंख्याक समाजाचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात…!

107

वासीक शेख

यवतमाळ शहर कोविड -१९ सारख्या साथीच्या रोगाशी लढत आहे त्यातूनच यवतमाळ शहरातील अल्पसंख्याक समाजाचे नागरिक गेल्या पंधरा वर्षापासून नागपूर रोडवरील बायपासवर पसरलेले घाणीशी लढत आहे या परिसरात कचरा, प्राणी आणि मानवी विष्ठा, मृत पक्ष्यांचा सांगाडा,चामडे,घाण इत्यादी घाणतून पसरणारे आजाराने अल्पसंख्याक समाज त्रस्त झाले आहे.तर त्यांच्या स्वच्छतेसाठी यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब,नगराध्यक्ष साहेब,स्थानिक खासदार,आमदार आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब इत्यादींना या समस्यांचे निवेदन अल्पसंख्याक समाजाच्या वतीने देण्यात आले आहे परंतु अल्पसंख्यक समाजाच्या लोकांना फक्त हमी मिळाली।

नागपूर रोड बायपासची स्थिती,दिवसेंदिवस वाईट होऊन राहिली आहे यवतमाळ नगर परिषद प्रशासनाने अल्पसंख्यांक समाजाच्या आरोग्याशी खेळू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.