Home विदर्भ उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना निवडणुकीपूर्वी ३०० युनिट वीज वापर...

उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील वीज ग्राहकांना निवडणुकीपूर्वी ३०० युनिट वीज वापर केल्यास ३० % स्वस्त वीज देण्याचे वचन दिले होते – आप

381

वचन न पाळता २० टक्के दर वाढ करून राज्यातील जनतेच फसवणूक करण्यात आली आहे . त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल‌ करावा

यवतमाळ – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१७ मध्ये शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वीज ग्राहकांना ( जनतेला ) काही वचन दिले होते . त्यामध्य प्रामुख्याने विजबिलाबाबत ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३० टक्के स्वस्त वीज करण्याचे वचन होते . याच्य वचननाम्याची प्रत सोबत जोडली आहे . या वचनांच्या आधारे राज्यातील जनतेनी यांना निवडून आणले आणि राज्याचे मा मुख्यमंत्री झालेत . यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळाल्यानंतर यानी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे याच राजकीय आणि नैतिक जबबदारी होती , परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे . या  देशात आणि राज्यात महामारीचे संकट असताना दि ०१ एप्रिल २०२० पासून जवळपास २० % वीज दर वाढ करून रु . प्रति युनिट तयार होणारी विज रु . ५ वसूल करते , एकूणच राज्यातील जनतेसोबत फार मोठा धोका केला आहे .

आम आदमी पार्टी व राज्यातील नागरिक सरकार कड़े वारंवार विनंती करीत आहेत , निवेदन देत आहेत . अनेक वेळा आंदोलन केलीत , पालकमंत्री यांच्या घरासमोर क्रांतीदिनी घेराव केला , वीज कार्यालयांना ताला ठोको आंदोलन केले परंतु सरकार केवळ चर्चा करून केंद्र सरकार कडे बोट दाखवीत आहे . याच पद्धतीने जर एखादी व्यावसायिक कंपनी ग्राहकांना आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करत असेल तर त्या कंपनीवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात . अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात श्री उद्धव ठाकरे राज्याचे मा मुख्यमंत्री झालेत आणि आता निवडणुकीपूर्वीचे वचन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत . एवढेच नव्हे तर महामारी च्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत धोखाधड़ी केली आहे . त्यामुळे त्याच धर्तीवर ग्राहक कायदा आणि IPC 420 अंतर्गत राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करवीत अशी मागणी करण्यात आली‌ . सदर निवेदन देतांना वसंतराव टोके , गुणवंतराव ‌इंदुरकर , विलास वाडे , अजय शर्मा , प्रवीण थुल ‌, अशोक काळमोळे सह ईत्यादी ‌पदाधिकारी उपस्थित होते .