Home बुलडाणा देऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन , ” गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले...

देऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन , ” गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले गावकरी”

166

देऊळगाव माळी ,  (कैलास राऊत) दि. :- २ विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या महिलेच्या अपत्या साठी आर्थिक निधी उभारून माणूसकीचे अदभूत दर्शन मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडले. या घटनेमुळे परत समाजाच्या दातृत्व शक्तीचा परिचय समाजाला घडला. दिनांक 27 सप्टेंबरला देऊळगाव माळी गावातील महिला सपना विलास गवई या महिलेचा विद्युत धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत यांनी सोशल मिडीयावर सपना विलास गवळी यांची मुलगी स्नेहा विलास गवळी हिच्या शैक्षणीक खर्चासाठी आर्थिक मदतीचे आवाहन असणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली तसेच स्नेहाच्या नावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खाते सुध्दा काढले. देऊळगावमाळी येथील प्रकाशभाऊ डोंगरे मित्र मंडळ ११००० रुपये,डॉ.विशाल वसंतराव मगर ५००० रुपये, बळी नाथगिरी महाराज ५००० रुपये ,डॉ.अमोल गवई ५००० रुपये ,नारायण बळी २१००रुपये ,सावरकर सर ११००रुपये ,पांडुरंग कृपा भजनी मंडळ अध्यक्ष जगन्नाथ चांगाडे ११०० रुपये ,पांडुरंग संस्थानचे अध्यक्ष टि.एल मगर ११०० रुपये तसेगावकऱ्यांनी तसेच असंख्य गावकऱ्यांनी पाचशे रुपये रक्कम या चिमुकलीच्या खात्यामध्ये जमा केली हि मदत करून चिमुकलीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले. व अनेकांनी अन्नधान्य सुद्धा या कुटुंबाला दिले विदयुत शॉक लागून मृत्यू पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयासाठी मदत करण्यासाठी गावकरी पुढे सरसावले. गावकऱ्यांनी मिळून ६७ हजार रूपये एवढा आर्थिक निधी उभा करून समाजापुढे एक आदर्श उभा केला. आर्थिक मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य दानशूर व्यक्तींनी मृतक सपना विलास गवळी यांची मुलगी स्नेहा विलास गवई या चिमुकलीच्या खात्यावर असंख्य लोकांनी आर्थिक रक्कम जमा करून त्या कुटुंबाला आधार दिला. या धकाधकीच्या जीवनात सुद्धा देऊळगाव माळी मध्ये पुन्हा एकदा माणूसकीचा पाझर फुटला याचा प्रत्यय गावकऱ्यांनी दाखवून दिला. देऊळगाव माळी गावातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत यांनी यापूर्वीसुद्धा ज्या कुटुंबावर संकट आली त्यामध्ये काही च्या घराला आग लागली असेल त्यांच्या घरामध्ये कुणाचे आजारपण असेल सोलापूर कोल्हापूरचा महाप्रलय असेल त्या प्रत्येक वेळेस वेळोवेळी फुल न फुलाची पाकळी म्हणून त्या संकटात त्या व्यक्तीला धीर देण्याचे काम पत्रकार कैलास राऊत व नारायण बळी यांच्या माध्यमातून या अनेक वेळेस त्या व्यक्तीला धीर देण्याचे काम केलेले करण्यात आलेला आहे. या चिमुकलीला शैक्षणिक खर्चासाठी पूर्ण फुलाची पाकळी आर्थिक मदत करावी जमा झालेल्या रकमेचा धनादेश स्वर्गीय सपना विलास गवळी यांचे पती विलास गवळी यांची मुलगी स्नेहा मुलगा यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द केली. पत्रकार कैलास राऊत,गजेंद्र गवई यांनी समाजाला केलेल्या आर्थिक आवाहनामुळे एका कुटुंबा मोठा आर्थिक मदत मिळाली. यावेळी पत्रकार कैलास राऊत नारायण बळी वसंतराव मगर पुरुषोत्तम बळी महाराज प्रकाश डोंगरे भिकाजी गवई सुरेश गवई गजेंद्र गवई दत्ता राऊत अनिल गायकवाडयावेळी गावकऱ्यांनी स्नेहाचे वडील विलास गवळी यांच्याकडे आर्थिक मदतीची रक्कम सुपूर्द केली.यावेळी पत्रकार कैलास राऊत,नारायण बळी,वसंतराव मगर,पुरूषोत्तम बळी महाराज,प्रकाश डोंगरे,भिकाजी गवई,सुरेश गवई,दत्ता सुरेश आत्माराम गवई अनिल गायकवाड यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते उपस्थित होते.