Home मराठवाडा हाथरस बलात्कार पीडितेला न्याय द्या ! माहूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली!

हाथरस बलात्कार पीडितेला न्याय द्या ! माहूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली!

147

मजहर शेख

राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांचा केला निषेध!

नांदेड / माहूर , दि . ०२ :-    उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मनीषा वाल्मिकी या 19 वर्षीय युवतीवर चार नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ हासडून निर्घृण खून केला. या घटनेनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वनासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा निषेधार्थ माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माहूर येथे सायंकाळी 7:00 वा.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मयत मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली अर्पण करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या दंडेलशाही कृत्याचा जाहीर निषेध केला. बलात्कार पीडितेच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, कार्यकर्त्यांनी मोदी, योगी मुर्दाबाद, तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा देत सदर घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी काँग्रेस युवानेते डॉ.निरंजन केशवे, काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई, शेख आयुब, नबीसाब, निसार कुरेशी, हनीफ अल्लाबक्ष, करीम शहा तय्यब शहा, अजीम सय्यद, किशन राठोड, सचिन बेहरे, घनश्याम केशवे, संदेश कायटे, प्रफुल कउडकर, राजकिरण देशमुख आदीसह अनेकांची उपस्थिती होती.