Home विदर्भ विधानसभा अध्यक्ष रविवारी हिवरी येथे येणार

विधानसभा अध्यक्ष रविवारी हिवरी येथे येणार

180
0

देवानंद जाधव
यवतमाळ –  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा नाना साहेब पटोले चार ऑक्टोबर रविवारी तालुक्यातील हिवरी येथे येणार आहेत.येथील गुणवंत विद्यार्थीनी सानिका सुधाकर पवार हिचा गुण गौरव करणार आहे. ” बापाची तिरडी अंगनात अन् लेक गेली परिक्षा केंद्रात “या मथळ्याखाली अलीकडेच वृत्त विविध माध्यमातून ऊमटले होते. बापाची तिरडी अंगनात बांधत असतानाच त्याच दिवशी सानिका चा संस्कृत विषयाचा पेपर होता. त्यामध्ये तिला शंभर पैकी शंभर गुण मिळाले शिवाय 97 टक्के गुण घेत ती अव्वल आली. तिच्या या कर्तृत्वाची दखल घेत विधानसभा अध्यक्ष मा. नाना साहेब पटोले यांनी थेट विधानभवनातुन दूरध्वनी द्वारे संपर्क करुन सानिकाचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप मारली होती. आणि यवतमाळ जिल्ह्यात येईल तेव्हा मी तुझ्या घरी येऊन असा शब्द दिला होता.तो शब्द रविवारी खरा ठरणार आहे. तिच्या पसंतीनुसार लातुरच्या नामांकित काॅलेज मध्ये तिला प्रवेश मिळवून दिला आहे. सानिकाची डाॅक्टर बनायची ईच्छा आहे. त्या साठी कठोर मेहनत घेत आहे.