Home विदर्भ तळेगांव येथील अपघातात वाहनांचा चुराडा, दोन महिला जखमी

तळेगांव येथील अपघातात वाहनांचा चुराडा, दोन महिला जखमी

60
0

कुक्कुटपालन केंद्राजवळील तो वळण मार्ग घेतोय जीव.. आणी जीवच,?

महिन्याच्या पहिल्याच तारखेला अपघाती सुरुवात..!

तळेगांव शा पंत :- ( रवींद्र साखरे ) –  तळेगांव येथील सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कुक्कुटपालन केंद्राजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात तळेगांव येथील एका खाजगी कंपनीच्या चार महिला कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
नागपुर येथून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या MH12 MF 7552 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी समीर माधव दिघेकर वय 49 वर्ष रा पुणे हा चालवत होता.तो तळेगांव च्या कुक्कुटपालन केंद्राजवळ आला असता त्याच वेळी सी डेट कंपनीची आयशर ट्रॅव्हल्स क्र. MH 31
ही ट्रॅव्हल्स या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना नेहमीकरिता कामावर घेऊन जात असताना या ट्रॅव्हल्स ने अचानक वळण घेतल्याने नागपुर हुन पुणे जाणाऱ्या कारने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली.यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र चांगलेच नुकसान झाले आहे.ही धडक ट्रॅव्हल्स ला डाव्या बाजूस खाली लागल्याने ट्रॅव्हल्स चे थोडेफार नुकसान झाले, या ट्रॅव्हल्स मध्ये बसून असलेल्या महिला कर्मचाऱ्यांपैकी धडक लागलेल्या ठिकाणी बसलेल्या जयश्री नानोटकर ,रा आर्वी यांच्या कमरेला मार लागला असून सरिता वल्लभकर रा आर्वी ह्या जखमी झाल्या आहेत. घटनेत स्विफ्ट चालक जखमी झाल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा होता.

तो वळण मार्ग ठरतोय जीवघेणा

कुक्कुटपालना जवळ असलेला तो वळण मार्ग जीवघेणा ठरत आहे, काही महिन्यांपूर्वी च या ठिकाणी एका तरुण विवाहित युवकाचा वळण घेताना मृत्यू झाला होता. त्याच्याही आधी याच ठिकाणी असंख्य अपघात होत असतात. याच ठिकाणी कुक्कुटपालन तसेच बारुद कँपणीचे कामगार जाणे येणे करत असल्याने भविष्यात सुद्धा इथे मोठा अपघात होऊ शकतो हे नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक किंवा दुसरा पर्याय शोधण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे.

ओरियांटल कँपणीचा निष्काळजीपणा ठरतोय घातक

ज्या ठिकाणी ही अपघात मालिका सुरू आहे त्या ठिकाणी असलेल्या वळण मार्गालागत असलेल्या दुभाजकावर माणसा एवढे झाडे वाढली असून कंबरेच्या खालो खाल गावत वाढलेले आहे. दुसऱ्या मार्गावरून वळण घेताना रस्त्यावरील काहीच दिसत नसल्याने अपघात वाढत असल्याचे नागरिक बोलत आहेत. तसेच तळेगांव शहरांत सुद्धा उड्डाण पुलाच्या खाली व बाजूला कंबर एवढे गवत वाढून असल्याने नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत, त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला माती मोठ्या प्रमाणात असल्याने यावरून दुचाक्या घसरत आहेत. हे सगळे प्रकार अपघात वाढवणारे असून याकडे तातडीने लक्ष्य देण्याची गरज आहे.