Home जळगाव किशोर पाटील कुंझरकरांचा कोरोना काळात घर.घर.शाळा..शिक्षण आपल्या दारी अभिनव उपक्रम…!

किशोर पाटील कुंझरकरांचा कोरोना काळात घर.घर.शाळा..शिक्षण आपल्या दारी अभिनव उपक्रम…!

309

आदिवासी वस्तींपर्यत परिस्थितीवर मात करत पोहचविले शिक्षण….!!

जळगाव –  कोरोनामुळे राज्यात सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू झाले असले तरी आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षाणात अनेक अडथळे येत आहे.या अडचणींचे रड्गाणे न गाता प्रयोगशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी घर…घर..शाळा-शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहोचविले आहे.
गरिबांच्या जीवनाशी स्वेच्छेने कोरोना काळात एकरूप होत संपुर्ण आदिवासी वस्ती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी स्वकल्पनेतून आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे घरी जात त्यांचे अंगणातच खाटेवर तर कधी दारी खाली बसून शालेय शिक्षण विभागाने दिलेली पाठ्य पुस्तक तसेच मार्गदर्शिका आणि विविध उपक्रम माध्यमातून कोरणा चे सर्व नियम पाळून मास्क सॅनिटायझर चा वापर करून पालकांच्या मदतीने सहकार्याने घर… घर.. शाळा शिक्षण आपल्या दारी हा अभिनव प्रयोग यशस्वी केला असून गरिबीमुळे मोबाईल स्मार्टफोन नसलेल्या आदिवासी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाला प्रवाहित ठेवण्याचे काम कोरोणा काळात केल्याने जळगाव जिल्ह्यातून आदिवासी वस्तीवरून एक धडपडी शिक्षक किशोर पाटील कुंझर कर यांनी सुरू केलेल्या व गरिबांच्या शिक्षणासाठी covid-19 कोरोणाच्या परिस्थितीत परिणामकारक ठरलेल्या घर..घर..शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रमांची या नावीन्यपूर्ण प्रयोगाची राज्य व देशपातळीवर स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम म्हणून दखल घेतली गेली आहे.
परिस्थितीनुसार उचललेले सुयोग्य पाऊल असून खऱ्या अर्थाने कोरोना काळात सर्व नियम पाळून स्वतःच्या आरोग्याचा आणि शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा समन्वय साधत उचललेले प्रेरणादायी पाऊल असल्याचे म्हटले. आदिवासी वस्तीवर पालकांकडे मोबाईल नसल्याने दोनच पालकांकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील आणि कालू पवार यांचेकडे मोबाईल फोन असल्याने त्यांची वस्तीवर शिक्षण मित्र म्हणून नेमणूक मुख्याध्यापक या नात्याने किशोर पाटील यांनी केली आणि दररोजचा प्राप्त अभ्यासक्रम त्यांच्या मोबाईल वर टाकून सर्वान पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला यामधील ही अडचण लक्षात घेता त्यांनी स्वतः आदिवासी वस्तीवर घरोघरी जाऊन घर.घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रयोग राबविला. आदिवासी समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात व विकासाच्या प्रवाहात यावे हा मूळ हेतू असून त्या दृष्टिकोनातून केंद्र शासन व राज्य शासन शिक्षण सर्वत्र सुरू राहण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमधून प्रेरणा घेत कृतीयुक्त आदर्श निर्माण करणाऱ्या किशोर पाटील कुंझरकर यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.