Home जळगाव उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर

139

५ सप्टेंबर शिक्षक दिनी होणार ऑनलाईन वितरण

 

रावेर (शरीफ शेख)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर ता.जामनेर येथील उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा सन २०२०-२१ या वर्षाचा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे.५ सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत ऑनलाईन पद्धतीने पुरस्काराचे वितरण होणार आहे.संदिप पाटील यांनी आतापर्यंत ढेकु खुर्द ता.अमळनेर,बिलवाडी ता.जळगाव या गावांमध्ये सेवा केली असून विद्यार्थ्यांसाठी शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,पढाई पे चर्चा असे एक ना अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबिले आहेत.या उपक्रमाची दखल घेत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केल्याचे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.कृष्णाजी जगदाळे यांनी कळविले आहे.संदिप पाटील यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.