Home महाराष्ट्र मैत्रेय गुंतवणूकदारांना परतावे कधी मिळणार ? संघटना आणि असोसिएशनच्या भूमिकेबाबत प्रश्न चिन्ह…

मैत्रेय गुंतवणूकदारांना परतावे कधी मिळणार ? संघटना आणि असोसिएशनच्या भूमिकेबाबत प्रश्न चिन्ह…

552

लक्ष्मण बिलोरे

राज्यात 1998 साली स्थापन झालेल्या मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीने 17 वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार केला परंतु 2015 साली मैत्रेयने कोट्यावधी रुपये जमा करून गाशा गुंडाळला मैत्रेयचे परतावे मिळवून देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या विविध संघटना किंवा असोसिएशनने गेल्या साडेचार वर्षांत राजकिय पुढाऱ्यांना निवेदन देणे, मंत्रालयात चकरा मारणे या व्यतिरिक्त कोणते काम केले? असा प्रश्न मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींनी सोशल मिडियावर बोलताना व्यक्त केला. मैत्रेयच्या विविध संघटना आणि असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी गुंतवणूकदार चर्चा करत असताना अत्यंत गंभीर बाब समोर आली. मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदार आणि एजंटांची फसवणूक केली असून कोट्यावधी रूपयांना गंडा घातला आहे. हे प्रकरण नाशिक कोर्टामध्ये सुरू असून गुंतवणूकदार आणि एजंट यांची बाजू कोर्टात कमजोर पडत असल्याने मैत्रेयचे परतावे मिळायला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मैत्रेय संघटना किंवा असोसिएशन यांनी लिगली अनधिकृतपणे पाठिंबा दिल्याची नोंद नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आणि एजंटांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मैत्रेयवर चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राॅपर्ट्या जप्त केल्या याचे श्रेय संघटना किंवा असोसिएशनला घ्यायची गरज नाही, मैत्रेयवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कार्यवाही केली. … राजकारणी लोक प्रसिद्धीसाठी फोटो सेशन करतात,मतांचे गणित मांडतात . मैत्रेय प्रकरण पोलीस ठाणे आणि कोर्ट या भोवती घोंघावत आहे…. असोसिएशन आणि विविध मैत्रेय संघटनांनी परतावे मिळवून देण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांत पोलीस ठाणे आणि कोर्टात गुंतवणूकदारांच्या बाजूने अधिकृत काम केले हे पुराव्यानिशी सादर करावे. मैत्रेय संघटना किंवा असोसिएशन हि गुंतवणूकदार आणि एजंटांची ताकद आहे. हि ताकद जर मुख्य फिर्यादी म्हणून खंबीरपणे पोलीस ठाणे आणि कोर्टापर्यंत पोहचत नसेल तर… मैत्रेयचे परतावे कशे मिळतील ????? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

*हे पण वाचा*
मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना
गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वर्षा सत्पाळकर यांची जामिनावर सुटका करण्यात आली. बाहेर पडल्यानंतर वर्षा सत्पाळकर चार वर्षांपासून फरारी आहे. मैत्रेय संचालकांवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वर्षा सत्पाळकरचा भाऊ मैत्रेयचा संचालक प्रसाद परुळेकर, नार्वेकर, तावडे यांच्यावरही फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मैत्रेयचे परतावे मिळण्यास विलंब होत असल्याने राज्यभरातील 47लाख गुंतवणूकदार हैराण आहेत. गुंतवणूकदारांच्या त्रासामुळे एजंट प्रतिनिधींना जीव गमवावे लागले आहेत. आजही हजारो मैत्रेय प्रतिनिधी मरणासन्न यातना भोगत आहेत. गेल्या साडेचार वर्षांत अनेक ठिकाणी आंदोलने झाली. मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना लाखों गुंतवणूकदारांनी इमेल करून मैत्रेयचे कष्टाचे, हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून विनवणी केली आहे.