Home मराठवाडा VBA च्या वतीने ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या प्रश्नासठी 20 ऑगस्ट रोजी...

VBA च्या वतीने ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या प्रश्नासठी 20 ऑगस्ट रोजी भव्य धरणे आंदोलन..

225

संजयकुमार बिलोलीकर

नांदेड :- जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत.

covid-19 च्या धर्तीवर मागील सहा महिन्यापासून राज्यात टाळेबंदी सुरू असून या काळी बंदीच्या परिस्थितीमुळे ऑटो रिक्षा चालक मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . प्रशासनाने मागील काही दिवसापासून ऑटो चालक मालक यांना ऑटो चालविण्यासाठी परवानगी दिली असली तरी ती अनेक कठोर नियम घालून देण्यात आली आहे . त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या रिक्षा चालक मालक यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे ऑटो मध्ये केवळ दोनच व्यक्तीना प्रवास करण्याची परवानगी दिल्यामुळे ऑटोचालक मालकांचा डिझेल पाण्याचा खर्चही निघत नसल्याने ऑटो चालक मालक हवालदिल झाले आहेत. अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विनंत्या करूनही यावर प्रशासन निर्णय घेत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑटो चालक मालक यांच्या न्यायिक हक्क मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत . या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते गोविंद दळवी, फारूक अहमद वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले इंजि प्रशांत इंगोले महासचिव शाम कांबळे साहेबराव बेळे महानगराध्यक्ष अयुब खान पठाण विठ्ठल गायकवाड महानगर महासचिव एड. शेख बिलाल , हनुमंत सांगळे कामगार आघाडीचे नेते इंजी. राज अटकोरे सम्यक विद्यार्थी आंदोलननाचे जिल्हाध्यक्ष संदीप वने, कैलास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे .

या आंदोलनात जिल्ह्यातील ऑटो चालक मालक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, रोहन कहाळेकर , धम्मपाल थोरात , नवनाथ तोटरे , सलीम भाई खाजामिया पठाण , विशाल येडके , महेंद्र सोनकांबळे ,अनिल वाठोरे, मंगेश गोडबोले , अविनाश भद्रे, शेख पाशा शेख रशीद, सुरत साळवे, धम्मपाल पैठणे , दीपक सोनटक्के , विद्यानंद पवळे , अनिल गायकवाड , जयदीप पैठणे ,सिद्धार्थ सोनकांबळे , भीमराव सोनाळे , सचिन सावंत , भाऊसाहेब कांबळे, मनोज इंगळे आदींनी केले आहे