Home जळगाव स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर अमळनेर शहराने घेतली, पश्चिम भाग,महाराष्ट्र राज्य,व...

स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल जाहीर अमळनेर शहराने घेतली, पश्चिम भाग,महाराष्ट्र राज्य,व नाशिक विभागात 10 व्या क्रमांकावर झेप….

143

रजनीकांत पाटिल

अमळनेर – स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या पहाणीमध्ये, हागणदारीमुक्त शहर,कचरामुक्त शहर व कागदपत्रे या बाबींची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणात करण्यात आली त्यात अमळनेर शहर हागणदारीमुक्तचे (ODF++) हे मानांकन मिळवून पश्चिम भाग (महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गोवा, गुजरात) महाराष्ट्र राज्य व नाशिक विभागात पहिल्या १० व्या क्रमांकावर आले आहे सन 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षनात अमळनेर शहराचा 130 क्रमांकावरून या वर्षी हागणदारीमुक्त शहर मानांकनात 10 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये अमळनेर शहराने सुरेख कामगिरी व उत्तम व्यवस्थापन केले असून शहरातील जमा होणारा घनकचरा व सेफ्टीटॅन्क बार मधून निघणारा मैला यावर प्रक्रिया केंद्र सुरू केले असून घनकचरा केंद्र व मल निरसारण केंद्र या बाबी सर्वेक्षण 2020 मध्ये निरखून पहिल्या गेल्या शहरातील रस्ते,शौचालये,बगीचे,नाले,नदी,कार्यालये मंदिरे याही बाबींवर सर्वेक्षण 2020 मध्ये कटाक्ष टाकण्यात आले व मूल्यांकन करण्यात आले

अमळनेर शहर-स्वच्छ सर्वेक्षण 2020

नाशिक विभाग- १०वा क्रमांक

महाराष्ट्र राज्य- १०वा क्रमांक

पश्चिम भाग- १०वा क्रमांक

एकूण गुण- ४१५९.४२/ ६००० गुणांपैकी

सदर सर्वेक्षनांसाठी अमळनेर नगरपरिषदेमार्फत योग्य ते व्यवस्थापन करण्यात आले होते त्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे बहुमोल मार्गदर्शन व कष्ट लाभले तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे नोडल अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,प्र.आरोग्य निरीक्षक अरविंद कदम सर्व प्रभागातील मुकादम, आरोग्य विभागातील सफाई कामगार, या सर्वांची मेहनत फळाला आली

उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, वरिष्ठ लिपिक संजय चौधरी, बांधकाम विभागातील अशोक भामरे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, विजय सपकाळे, तसेच गेल्या दोन वर्षांपासून शहर समनव्यक म्हणून काम करणारे गणेश गढरी यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे

या यशाबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील व सध्याच्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी सर्व्यांचे अभिनंदन केले असून सर्वेक्षण 2021 ला शुभेच्छा दिल्या आहेत