महत्वाची बातमी

आजोबाने सख्ख्या अल्पवयीन नातीवर केला शारीरिक अत्याचार ,

Advertisements
Advertisements

नात्याला कलंकीत करणारी घटना ,

अमीन शाह

पुणे ,

आजी आणि आजोबांनी शारिरीक संबंध प्रस्थापित करून ते अल्पवयीन नातीला जबरदस्तीने बघायला लावले. तसेच न बघितल्यास मारहाण व शिवीगाळ केली. त्याचबरोबर याच अल्पवयीन मुलीवर तिच्या मावशीच्या पतीने बलात्कार केल्याचा प्रकारही समोर आला असून, माळशिरस तालुक्यातील या घृणास्पद घटनेबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलीने याबाबत एका सामाजिक संस्थेच्या माध्यामातून चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा माळशिरस येथील वेळापूर परिसरातील पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या सख्ख्या आजी-आजोबांनी पीडितेसमोरच शारिरीक संबंध प्रस्थापित करून ते पाहण्याची जबरदस्ती केली. २०१४ पासून २०२० पर्यंत वेळापूर, पंचशिल नगर व मसवड येथे ही घटना घडली आहे. पीडितेने या प्रकाराला नकार दिल्यानंतर तिला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच पीडित मुलीचे आजोबा यांनी मुलीवर शारिरीक अत्याचारही केले. फिर्यादीने याविषयी आजीला सांगितले असता, तिने याकडे दुर्लक्ष केले. तसेच पीडितेच्या मावशीचा पती यानेही तिला गावाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने हा प्रकार पुण्यातील एका सामाजिक संस्थेला तिच्या नातेवाइकांमार्फत कळवला. त्यानंतर या संस्थेच्या मदतीने तिने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आजी, आजोबा आणि मावशीच्या पतीवर गुन्हा दाखल करून तो तपासासाठी माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे वर्ग केला आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...