Home महत्वाची बातमी यशोदा नदीच्या पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प.

यशोदा नदीच्या पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प.

214

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

मोठया अपघाताची शक्यता
देवळी-नांदोरा वाहतुकीवर परिणाम

वर्धा – जिल्ह्यातील देवळी – नांदोरा जाणाऱ्या रस्त्यावरील यशोदा नदीच्या पुलावर मोठा खड्डा पडल्याने आज गुरुवारी सकाळी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.मुख्यतः हा मार्ग देवळी- नाचनगाव जाणारा असून या मार्गावरील सर्व गावांचा देवळी शहराशी संपर्क येतो.मार्गावरील गावांचा मुख्य मार्ग असल्याने पुलावर खड्डा पडल्याने देवळीशी संपर्क तुटला आहे.मागील वर्षी पावसाळ्यात हा पूल नुकसानग्रस्त झाला होता.परंतु प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरळीत केली होती.
शेतीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला औषधी,खते नेण्यास पुलामुळे वाहतूक खोळंबल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक शेतकऱ्याची शेती नदीच्या पलीकडे आहे.शेती साहित्य,बैलजोडी नेण्यास अडचण निर्माण होत आहे.आकस्मिक काळात किंवा रुग्णांना मार्ग बंद असल्यामुळे उपचाराला सुद्धा मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेक वर्षापासून असलेल्या पुलामुळे दरवर्षी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने नवीन पूल बांधण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.प्रशासनाचे अती महत्वाच्या बाबी कडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.