
लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी
जालना – जिल्ह्याच्या घनसावंगी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना कोरोना संशयित क्वारंटाईन केलेल्या रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,भास्कर पांढरे,योगेश ढोणे,विलास चव्हाण,शेख नसीर, लहू मुळक या निवेदनात घनसावंगी येथे कोरोना संशयित रुग्णाची कुठल्याच प्रकारची सोय नाही. सॅनीटायझर उपलब्ध नाही,साबण हलक्या दर्जाचे आहे,रुग्णांना मास्क दिले जात नाही,डॉक्टर कडून रुग्णांना इतर आजाराचे उपचार केले जात नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे असुन जेवायला पत्रावळी आहे व द्रोण नाही पन्नी मध्ये भाजी खावी लागते,बाथरूम ची सोय नाही सर्वासाठी फक्त चार बाथरूम आहे,अंघोळीला गरम पाणी नाही,लाईटची गैरसोय आहे अशा अनेक समस्या आहे तरी तहसीलदार योग्य ती कार्यवाही करावी नसता भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी नसता होणाऱ्या परिणामास सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.











































