Home विदर्भ अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा पर्दाफाश , लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीचे जिवन संपविले

अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा पर्दाफाश , लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीचे जिवन संपविले

126

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ , दि. १२ :- लाडखेड हद्दीतील ग्राम वारज शेत शिवारातील एका विहीरीमध्ये २५ ते ३० वर्षे वयोगटातील अज्ञात महीलेचा मृतदेह आढळुन आला होता. ही घटना दिनांक ५ जुलै २०२० रोजी घडली होती. प्रकरणी वारज येथील पोलीस पाटील सुधाकर रघुजी डोळे यांचे तक्रारीवरुन लाडखेड पोलीस स्टेशनला मर्ग क्र. २२/२०२० कलम १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सदर आकस्मात मृत्यूमधील मृतक महिला अनोळखी असल्याने महीलेची ओळख पटविण्याचे दृष्टीने पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेस समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन पोलीस अधीक्षक यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व पथकातील कर्मचारी हे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात समांतर तपास करीत असतांना या दरम्यान यवतमाळ परिसरातील पोलीस स्टेशनला नोंद असलेली हरविलेले ईसम तपासुन आढावा घेत असतांना पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे दिनांक ६ जुलै २०२० रोजी सौ. शिला गुणवंत मोरे रा.देविनगर लोहारा यांच्या तक्रारीवरुन हरविले .मुलगी काजल गुणवंता मोर वय १८ वर्षे हरविले बाबत पोलीस स्टेशनला नोंद आढळुन आल्याने लाडखेड येथील अकस्मात मृत्यूतील महिला व हरविली मुलगी यांचे वर्णन व अंगावरील वस्तु तसेच हरविले मुलीचा फोटो प्राप्त करुन तपास केला असता लाडखेड येथील अकस्मात मृत्यू मधील अनोळखी महिला ही काजल मोरे असल्याचे सौ.शिला मारे यांनी ओळखले. त्यावरुन अधिक तपास केला असता सदर मृतक मुलीचे तिवसा ता.दारव्हा येथील गजानन कैलास सूदगूते याचे सोबत प्रेमसंबंध असल्याची बाब समोर आली तसेच मृतक मुलीचे आईने सुध्दा सदर ईसमावर संशय देर्शविला.
गजानन कैलास सूदगूते (२२) रा.तिवसा ता.दारव्हा असे पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शोध पथकाने आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता आरोपीचे याचे मृतक काजल सोबत एक वर्षापासून प्रेमसंबंध होते व तीचे आईचा लग्नाला विरोध असल्याने आरोपीचे वडीलांनी त्याचे दिनांक ६जुन २०२० रोजी आर्णी येथील मुलीशी लग्न लावून दिले. अशातच दिनांक ३ जुलै २०२० रोजी कु.काजल मोरे ही यवतमाळ येथून तिवसा येथे आली व तीने आरोपीकडे बायकोला हाकलून दे व माझेशी लग्न कर असा तकादा लावल्याने त्याच दिवशी दुपारी तीला वारज शेत शिवारातील एका विहीरीत ढकलुन मारुण टाकल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी मृतक मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन लाडखेड पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील कार्यवाही कामी लाडखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास लाडखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सकाराम ढोके करीत आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार बंडु डांगे, हरीश राऊत, गजानंद हरणे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच पोलीस अधिक्षक यांचे पथकातील पोलीस हवालदार साजिद शेख, अजय डोळे, वासु साठवणे, रुपेश पाली, योगेश डगवार यांनी पार पाडली.