Home विदर्भ वीटभट्टी परिसरात अखेर वीज खांबाचे उदघाटन..!

वीटभट्टी परिसरात अखेर वीज खांबाचे उदघाटन..!

92

गुरुदेव युवा संघाच्या पाठपुराव्याला यश
समस्त नागरिकांनी केला मनोज गेडाम यांचा जाहीर सत्कार

यवतमाळ – मागील ३० वर्षांपासून वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित होते. वीज, पाणी, अश्या मूलभूत सुविधांपासून गोरगरीब मजूर वर्ग वंचित राहत होता. गुरुदेव गुरुदेव युवा संघाच्या वतीने जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा केला. तसेच वेळप्रसंगी मोर्चे आंदोलनेकरून नवीन पाईपलाईन तसेच विजेचे खांब बसविण्याची मागणी ज़ोर लावून धरली अखेर वीटभट्टी परिसरात अखेर वीज खांबाचे उदघाटन काल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना वीज मीटर घेणे शक्य झाले असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात अली. त्यामुळे समस्त महिला व पुरुषांनी गेडाम यांचा पुष्पहार देऊन जाहीर सत्कार केला.
वीटभट्टी परिसरातील नागरिक गेल्या ३० वर्षांपासून वीज, पाण्याविना राहत होते. फक्त मतदानाच्या वेळी लोकप्रतिनिधी येतात मात्र मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यास कुणीही येत नाही.

मात्र गुरुदेव युवा संघाच्या पाठपुराव्याने आम्हा गोरगरिबांना विजेची व पाण्याची सोया झाली असे येथील महिला पुरुषांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी वीटभट्टी परिसरातील नागरिकांना जागेचे पट्टे लवकरच मिळवून देऊ तसेच त्यांना घरकुल, रस्ते, नाल्या आदी मूलभूत सुविधाही पुरवू असे आश्वासन दिले. यावेळी मंद मानकर, मीना जैस्वाल, संध्या नाखले, छाया निमकर, उषा खरवंडी, आदी महिला पुरुष उपस्थित होते.