Home उत्तर महाराष्ट्र विना – अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनास शंभुसेना , माजी सैनिक आघाडीचा जाहीर पाठिंबा….!

विना – अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनास शंभुसेना , माजी सैनिक आघाडीचा जाहीर पाठिंबा….!

383

अ.नगर – प्रतिनिधी

अहमदनगर – महाराष्ट्र राज्य विना-अनुदानीत उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने दि.१ जून २०२० पासून शिक्षकांनी राज्यभर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनास शंभुसेना सामाजिक संघटनेनेही आपला जाहीर पाठिंबा दर्शीविला असून शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींना तसे पत्रच ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज, माजी सैनिक व शंभुसेना प्रमुख मा.श्री. दिपकराजे शिर्के यांनी दिले आहे.

शिक्षक संघटनेचे श्रीगोंदा तालूका अध्यक्ष श्री. दादासाहेब गिरमकर तालुका सचिव श्री. नितीन झणझणे, शिक्षक श्री. संजय लकडे, श्री.राम सोनवणे यांनी शंभुसेना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पाठिंब्याची मागणी केली होती. त्यानुसार शंभुसेना संघटनेने पाठींबा जाहीर करत तसे समर्थन पत्र दिल्याने शिक्षकांच्या आंदोलनाची ताकत वाढली असल्याबाबत अनेक शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लवकरच लॉकडाऊन नंतर होणाऱ्या तीव्र आंदोलन केले जाईल तेव्हाही शंभुसेना संघटना थेट आंदोलनात उतरेल अशी ग्वाहीच शंभुसेना प्रमुख दिपकजी राजेशिर्के यांनी देत पाठिंबा पत्र दिले आहे.

विना-अनुदानिक उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेत मोलाचे भरीव कार्य करणाऱ्या आदरणीय शिक्षक महोदयांच्या गेली 20 वर्षांपासून राज्यातील असंख्य (सुमारे ३०हजार) शिक्षक अजूनही फुकट शिकविण्याचे कार्य करत आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विना-अनुदानिक उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत, यात प्रामुख्याने मागील १३ सप्टेंबर २०१९ च्या (GR) शासन नोंदी आदेशानुसार २० टक्के अनुदानास पत्र असणारे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, क्षेत्रीय स्तरावरील ज्युनियर कॉलेज शिक्षक तसेच अघोषित ज्युनियर कॉलेज घोषित करून संबंधित शिक्षकांच्या खात्यावर त्वरित पगार जमा करावेत अशी विंनती शंभुसेना संघटनेने मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षकांनी तहसीलदार महेंद्र माळी यांनाही वरील मागण्यांबाबत निवेदन दिले आहे. त्यानुसार वेतनासह विविध मागण्यासंदर्भात १ जून २०२० पासून सुरू होणाऱ्या शिक्षकांच्या घरातुनच सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनास (उपोषणास) शंभुसेनेने पाठिंबा दिल्याने आता राज्याचे लक्ष लागले असून, सर्वच विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा वेळ प्रसंगी गरज पडल्यास शंभुसेना राज्यभर होत असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशाराच शंभुसेनेने दिला आहे.