Home मराठवाडा नांदेड येथे रविवारी पुन्हा २ कोरोना रुग्णांची भर, व एकाला सुट्टी, तर...

नांदेड येथे रविवारी पुन्हा २ कोरोना रुग्णांची भर, व एकाला सुट्टी, तर ४ कोविड रुग्णांची प्रकृती चिंताजनक

110

नांदेड , दि. ३१ ( राजेश एन भांगे ) नांदेड जिल्ह्यातील रविवार दिनांक 31 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 30 अहवालापैकी 28 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 146एव्हढी झाली आहे.

आज दिवसभरात प्राप्त झालेले 2 पॉझिटिव रुग्ण (वय वर्ष 27 व 32) हे भेंडेगाव ता. मुखेड येथील असून, दोन्ही रुग्ण मुंबईवरून प्रवास करून आल्याची माहिती आहे. या दोन्ही रुग्णांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

रविवार दिनांक 31 मे 2020 रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 पुरुष रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत 146 रुग्णांपैकी 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे, व 2 पॉझिटिव्ह रुग्ण फरार असून, इतर 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित 34 रुग्णांवर औषधोपचार चालू असून, त्यातील 4 रुग्णांपैकी दोन स्त्री रुग्ण आहेत, ज्यांची वय वर्ष 52 व 65 आणि दोन पुरुष रुग्ण ज्यांची वय वर्ष 38 व 80 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.

व तसेच दिनांक 30 मे 2020 रोजी प्रलंबित असलेल्या 152 स्वॉब तपासणी अहवाला पैकी 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 112 तपासणी अहवालांचा रिपोर्ट आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल व दिनांक 31 मे 2020 रोजी 65 स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे रिपोर्ट्स उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 2 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ दिवसभरात एका रुग्णांला सुट्टी.

☑️ एकूण रुग्ण संख्या 146 वर.

☑️ आत्तापर्यंत 104 बरे होऊन घरी.

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️8 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️34 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️2 संदर्भीत रुग्णांवर मुंबई येथे उपचार सुरू.

☑️ 2 महिला रुग्णांची प्रकृती चिंताजनक.

दरम्यान जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सदर माहिती ३१ मे. २०२० रोजी सायं ५ वा. प्राप्त नुसार.