Home मराठवाडा घनसावंगी तालुक्यात महेश नवमी साजरी , घरोघरी महेशाचे विधीवत पूजन…

घनसावंगी तालुक्यात महेश नवमी साजरी , घरोघरी महेशाचे विधीवत पूजन…

258

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सकल राजस्थानी समाजाच्या वतीने आपापल्या घरी भगवान महेशाचे विधिवत पूजन करून महेश नवमी साजरी करण्यात आली.

महेश नवमीच्या दिवशी माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झालेली आहे. यंदा याला ५१५५ वर्षे होत आहेत. समाजाचा उत्पत्ती दिवस असल्यान माहेश्वरी समाजातच नाही तर संपूर्ण राजस्थानी समाजात महेश नवमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुंभार पिंपळगाव येथे राजस्थानी समाजाची जवळपास ६० ते ६५ घरं असून, येथे महेश नवमीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल असते. विशेषतः तरुण मंडळ यासाठी पुढाकार घेऊन सार्वजनिक उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी परिश्रम घेतात. दरवर्षी राजस्थानी समाजाच्या वतीने भगवान महेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते. यानिमित्ताने प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करून व गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी, विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र कोरोना विषाणूंच्या संकटामुळे सगळीकडे लाॅकडाऊन असल्याने कार्यक्रम सार्वजनिक बंधनात अडकली आहेत. याचे भान ठेवून कुंभार पिंपळगाव येथील सकल राजस्थानी समाजाच्या वतीने घरोघरी भगवान महेशाचे विधिवत पूजन करून आनंद साजरा केला.