Home जळगाव बोदवडात सामाजिक कार्यकर्ते नहिम खान बागवानवर प्राणघातक हल्ला ; भाजपच्या नगराध्यक्षपती सहित...

बोदवडात सामाजिक कार्यकर्ते नहिम खान बागवानवर प्राणघातक हल्ला ; भाजपच्या नगराध्यक्षपती सहित अन्य ६ जणांवर गुन्हा दाखल

53
0

रावेर – शरीफ शेख

जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील नईम खान बागवान यावर राजकिय सुडबूद्घीने बागवान मोहल्ल्यातील पाण्याच्या टाकीजवळ दिनांक २६ रोजी सात जणांकडून धारदार लोखंडी दांड्याने हमला करत प्राणघातक हल्ला केला. याबाबत नईम खान याच्या फिर्यादीवरुन भाजपच्या नगराध्यक्ष पतीसहित अन्य सहा जणांवर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, १८८, २६९, २७०, २७१ गून्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादित ; दिनांक २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बागवान मोहल्ल्यातील पाण्याच्या टाकीजवळून मोटारसायकलीने जात असतांना अचानक नगराध्यक्ष पती सईद बागवान यांचे लहान भाऊ असलम बागवान याने लोखंडी पट्टीने डाव्या डोळ्याच्या खाली मारुन दुखापत केली व याठिकाणी असलेल्या हारुन बागवान याने डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी धारदार वस्तूने दुखापत केली. रहीम बागवान याने लाकडी दांड्याने पाठीवर मारले. त्यानंतर मोटारसायकलीच्या खाली पडलो असता दानिश बागवान, सईद बागवान, इरफान बागवान, साजीद बागवान, यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करित शिविगाळ केली. ‘तू माझ्या काळात जास्त अर्ज फाटे करतो तूला समजावून सांगितले तरी तू एकत नाही’ असे म्हणत मारहाण केली.
याप्रकरणी शेख असलम शे.इब्राहीम बागवान, शेख हारुन शे.इब्राहीम बागवान, शेख रहिम शे. गनि युद्दीन बागवान, शे. दानिश शे.सकील बागवान, शे.सईद शे. इब्राहीम बागवान, शे.ईरफान शे. ईब्राहीम बागवान, शे.साजीद शे.सईद बागवान या सात जणांवर गून्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विलास महाजन करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting