Home मराठवाडा कोणत्याही कोरोना बाधिताची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पसरविल्यास कारवाई – जिल्हाधिकारी श्री....

कोणत्याही कोरोना बाधिताची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पसरविल्यास कारवाई – जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर

95

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

परभणी , दि. २७. :- कोणत्याही कोरोना बाधित रुग्णासंबंधीची वैयक्तिक माहिती ही गोपनीय स्वरुपाची असल्यामुळे अशी माहिती व इतर संवेदनशील माहिती सोशल मीडियावर पसरविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली.
जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज असुन खबरदारीचा भाग म्हणुन सर्व प्रकारच्या अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी अफवांवर विश्वास ठेवुन घाबरून जाऊ नये तसेच कुठल्याही अफवांना बळी पडु नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.