Home विदर्भ शेतकऱ्यांना सर्वोपरी मदत करावी – ना. केदार.

शेतकऱ्यांना सर्वोपरी मदत करावी – ना. केदार.

80
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

खरिपासाठी बँकांनी सकारात्मक धोरण ठेवावे.

कास्तकाराकडील शेवटचे बोन्ड देखील खरेदी करावे.

वर्धा – राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे नवा खरीप हंगाम सजवण्यासाठी ब्यांकाणी तसेच इतर वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुनील केदार यांनी वासुदेव जिंनिगच्या आवारात आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थित सरकार क्षेत्रातील मान्यवर व शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मंत्री महोदयांनी रोज १० अतिरिक्त वाहनातील कापूस खरेदी करा, अशा सूचना केल्यात.

आज बुधवारी सकाळी सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीत आडकाठी असल्याची ओरड असल्यामुळे ना. केदार यांनी जिल्ह्याचा दौरा काढला होता. मागील पंधरवाड्यात झालेल्या वादळ आणि पावसामुळे काही वेळासाठी कापूस खरेदी थांबविण्यात आली होती. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही, याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी पालकमंत्र्याचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देतांना ना. केदार यांनी बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोणे, सिंदी बाजार समितीचे सचिव आय. आय. सूफी तसेच सहकार क्षेत्रातील इतरांना शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदी करतांना कसलीही आडकाठी आणू नये, अशा सूचना केल्या. यावेळी जिनिंग-प्रेसिंग संस्थेच्या संचालकांनी मनुष्यबळ कमी आहे व शेतकऱ्यांकडून गर्दी होते, असे मंत्री महोदयाच्या लक्षात आणून देण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख दिनेश तेली यांनी कापूस संकलन केंद्रात सरकी आणि गासड्यांचा साठा तुंबून आहे, त्यामुळे अडचण जाते, असे सांगितले.

Unlimited Reseller Hosting