Home मराठवाडा देशातील पहिली पोस्ट बँक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी सन्मान निधी अनुदान पैसे...

देशातील पहिली पोस्ट बँक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी सन्मान निधी अनुदान पैसे वाटप

425

जय जवान…. जय किसान…चे पोस्ट बँकेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले स्वप्न पूर्ण.

नांदेड / किनवट – दि.२६ तालुक्यातील पोस्ट बँकेचे पोस्टमन यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अनुदान सरकार मार्फत जमा करण्यात आले आहे.
या आमच्या बळीराजा सन्मान पोस्ट बँकेनी केला आहे.अनेक वर्षाचे जय जवान जय किसान यांचे स्वप्न पूर्ण इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनी केले आहे.
ही देशातील पहिली बँके आहे की पोस्टमन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी सन्मान निधी अनुदान पोस्ट बॅंकेचा Aeps प्रणाली द्वारे वाटप केले आहे.
पोस्ट बँक पोस्टमन कर्मचारी म्हणतो शेतकरी सुखी तर देश सुखी.
श्री.छत्रपती शिवराय नी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचं दु:ख समाजावून घेणारे राजे होते.
त्याच्या नंतर पोस्ट बँक थेट शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेतकऱ्याचा सन्मान करून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी पैसे देणारी पहिली बँक ठरली आहे.
भारत हा शेती प्रधान देश आहे. हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

बातमीपत्र :सुरेश सिंगेवार [ विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.]

शेतकरी शेती पिकवून संपुर्ण देशाची भुक भागवतो.भारत 2020 मध्ये महासत्ता होण्याचा आशावाद व्यक्त होतो.
शेतकऱ्यांना सन्मानाने ‘ बळीराजा ‘म्हंटले जाते.परंतु प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झाल्यामुळे पोस्टमन विविध योजणांचे अनुदान वाड्या तांड्यात, ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही बँकेतील उदा:स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक,आय सी आय,बडोदा बँक,दैना बँक,युनियन बँक,H D F C बँक,व ईतर बँकेच्या खात्यातील पैसे पोस्ट बँकेच्या Aeps प्रणाली द्वारे रोख रक्कम वाटप करत आहेत.
ते पण कोणतेही शुल्क न घेता देश सेवा पोस्ट बँक संपूर्ण देशात करत आहे.
हे आपल्याला देशाचे मा. प्रधानमंत्री यांनी मन की बात या कार्यक्रमा द्वारे गेल्या महिन्यात सांगितले आहे.
शेतकऱ्याचे पेरणी चे दिवस जवळ येऊन टेकले आहे.
बळीराजा घामाग्रस्त झाला आहे. त्यांच्या कपाळावर आटयामात्र कायम आहेत.
या हंगामात सावरेल अशी आशा शेतकरी बाळगून आहे.
कापूस, तूर,उडीद,सोयाबीन, ज्वारी,हळद, यासाठी शेतीचे मशागतिकचे काम पूर्ण केले आहे. पेरणी बाकी आहे.
पीक उत्तम चागले येईल असे शेतकरी पोस्टमन जवळ चर्चा मधून सांगत आहे.
शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात आलेले शेतकऱ्यांचे सर्व अनुदान बियाणे , खते , कीटकनाशके औषधी,घेण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरबँकेतील पैसे काडून देण्याची व्यवस्था पोस्ट बँकेनी केली आहे. एक ही शेतकरी बँकेत गर्दी करू नये. असे अहवान मा.डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी केले आहे.