Home विदर्भ वड़की येथे लॉकडाऊन मध्ये विवाह सोहळा संपन्न …

वड़की येथे लॉकडाऊन मध्ये विवाह सोहळा संपन्न …

18
0

एक विवाह ऐसा भी…

प्रतिनिधी – वडकी

यवतमाळ / राळेगाव – लॉकडाऊन मध्ये शिस्तीचे आणि फीजिकल डिस्टेंसचे पालन करत विवाह सोहळा पोलिस प्रशासनाला विश्वासात घेवून वड़की येथे संपन्न झाला. वधु कडील पाच तर वरा कडील पाच अशा पाहूण्याच्या उपस्थितीत विवाहाचे आयोजन अगदी साध्या पद्धतिने करण्यात आले. वड़की येथील वधु चि.सौ.का. प्रियंका उत्तमराव कोरडे संग वर चि. अक्षय वसंतरावजी बूच्चे , रा. साखरा असून यांच्या विवाहबंधनाला आशीर्वाद देण्यास डिजिटल माध्यमातुन शुभेछ्या तर फेसबुक वरुन नातेवाईकाना Live लग्न सोहळा पाहण्यास मिळाले. आज विश्वावर महामारीचे संकट असताना कुठल्याही गाजावाजा न करत शांत रीतीने लग्न सोहळा पार पडला आणि सर्व लोकांना या विवाहतुन संदेश देण्यात आला की सर्वानी थोंडाला ( मास्क ) अथवा रुमाल बांधून लॉकडाऊनचे पालन करुण सहकार्याची भूमिका ठेवावी तसेच सर्वानी अशा रीतीने विवाह करावे. त्या नंतर वधु वराने पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Unlimited Reseller Hosting