Home मराठवाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहुल रत्नपारखे यांच्या वतीने दारू विषयी निवेदन…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राहुल रत्नपारखे यांच्या वतीने दारू विषयी निवेदन…!

153

गौरव बुट्टे

जालना – लॉकडाऊन काळातील दारू विक्री व्यवहाराची चौकशी करून सोशल डिस्टन्सींगच्या अटीवर सर्व परमिट रुम व दारु विक्रेत्यांना मद्य विक्रीच परवानगी देण्यात यावी. आपल्या सेवेत जालना शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात दि . ०४ ते १७ मे या कालावधीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे . लॉकडाऊन च्या संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून शासनाने महसूल मिळण्यासाठी मद्य विक्रीसाठी परवानगी द्यावी असे सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुचवले होते . अखेर राज्य शासनाने त्यांनी मांडलेली सूचना मान्य केली असून राज्यात दारू विक्री स परवानगी दिली आहे . तथापि जालना जिल्ह्यात परवानगी देण्यात आली नाही . लॉकडाऊन काळात मद्य विक्रेत्यांनी गोदामात साठवलेल्या साठ्याची परस्पर विल्हेवाट लावत शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे . या सर्व गैरप्रकाराची उत्पादन शुल्क विभागामार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि कायमस्वरूपी परवाने निलंबित केले जावेत अशी मागणी मनसेच्या वतीने आम्ही करत आहोत . आधीच गेली ४५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे या व्यवसायातील कर्मचारी बेरोजगार झाले आहेत . त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत . शिवाय व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून गैरमार्गाने विक्री चे प्रकार वाढले आहेत . परिणामी शासनाचा महसूल ही बुडाला . राज्य शासनाने दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मार्गदर्शक अटी व नियम घालून दारु विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे . तरी आपण मालक व कर्मचारी यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न याचा विचार करावा आणि जालना जिल्ह्यात सर्व परवाना धारकांना दारु विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी . सध्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने बनावट दारू ची विक्री होत असून ती आरोग्यासाठी हानिकारक असल्याने अनेकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे .

आपण परवानगी देतांना वाईन शॉप वर गर्दी उसळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची जाणीव आम्हांस आहे . हे लक्षात घेता . वाईन शॉप वरील गर्दी कमी करावी . तसेच सोशल डिस्टन्सींग चे तंतोतंत पालन होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परमिट रूम धारकांना पार्सल दारु विक्रीची परवानगी द्यावी . सोशल डिस्टन्सींग च्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसे सैनिक पोलीस प्रशासनास सहकार्य करतील . तरी लॉकडाऊन काळात झालेल्या दारू विक्री व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे . तसेच सोशल डिस्टन्सींग च्या अटींवर दारु विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात यावी . अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत आहोत . राहुल रत्नपारखे शहराध्यक्ष , मनसे , जालना महेश नागवे , संजय राजगिरे , गणेश धांडे , शरद मांगधरे , आकाश जाधव , अजय मोरे पंकज घोगरे , नितीन राठोड , सुरेश वैद्य , अमोल जाधव , अक्षय कोळकर जोहेब शेख उपस्थित होते.